रत्नागिरी, सिंधुदुर्गात २० हून अधिक नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२४ मार्च) पुन्हा एकदा नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे २८ रुग्ण आढळले, तर १९ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गातही आज नवे २४ रुग्ण आढळले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी ८, चिपळूण ३, संगमेश्वर १ (एकूण १२). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी आणि खेड प्रत्येकी १, दापोली, संगमेश्वर आणि मंडणगड प्रत्येकी २, चिपळूण ८ (एकूण १६). (दोन्ही मिळून २८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ४९१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ७९६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९३ हजार ७४३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १९६ आहे. त्यातील सर्वाधिक ५२ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून ९८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १९ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ८८२ झाली आहे. त्यामुळे करोनामुक्तीचा दर घटून ९४.१९ टक्के झाला आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ असून मृत्युदर ३.५४ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२४ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज २४ नवे रुग्ण आढळले, तर २९ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ६ हजार ७७१, तर करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ३७६ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८० असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply