रत्नागिरीत करोनाबाधितांच्या संख्येत घट, सिंधुदुर्गात २४ नवे रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपेक्षा आज (२३ मार्च) नव्या करोनाबाधितांच्या संख्येत चांगलीच घट नोंदविली गेली. आज नवे ७ रुग्ण आढळले, तर २८ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात २४ नवे रुग्ण आढळले, ११ करोनामुक्त झाले, तर एकाचा मृत्यू नोंदविला गेला.

रत्नागिरी जिल्ह्यातील स्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १, संगमेश्वर २ (एकूण ३). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी ३, लांजा १ (एकूण ४). (दोन्ही मिळून ७). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ४६३ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ४३५ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ९२ हजार ९४७ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २०६ आहे. त्यातील सर्वाधिक ५६ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून १०३ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज २८ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या नऊ हजार ८६३ झाली आहे. त्यामुळे करोनामुक्तीचा दर वाढून ९४.२६ टक्के झाला आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ असून मृत्युदर ३.५४ टक्के आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती

सिंधुदुर्गात आज (२३ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज २४ नवे रुग्ण आढळले, तर ११ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ६ हजार ७४७, तर करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६ हजार ३४७ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. मिठबाव (ता. देवगड) येथील ५३ वर्षीय पुरुषाचा मृत्यू आज झाला. त्या रुग्णाला मधुमेहाचाही त्रास होता. त्याच्या मृत्यूमुळे करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८० झाली असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply