रत्नागिरीत ६४, तर सिंधुदुर्गात ४७ नवे करोनाबाधित

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२५ मार्च) पुन्हा एकदा नव्या करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली. आज नवे ६४ रुग्ण आढळले, तर १७ रुग्ण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे ४७ रुग्ण आढळले, तर केवळ आठ रुग्ण करोनामुक्त झाले.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तालुकानिहाय तपशील असा – आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी १०, दापोली १३, खेड ७, गुहागर ९, चिपळूण ७, संगमेश्वर ४, मंडणगड २, राजापूर ५ (एकूण ५७). रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार रत्नागिरी, खेड आणि गुहागर प्रत्येकी १, चिपळूण आणि लांजा प्रत्येकी २ (एकूण ७). (दोन्ही मिळून ६४). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार ५५५ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी १७१३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून, आतापर्यंत ९५ हजार ४५६ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या २४२ आहे. त्यातील सर्वाधिक ६१ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल असून, १२८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज १७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९८९९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर घटून ९३.७८ टक्के झाला आहे.

आज नव्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची संख्या ३७१ असून मृत्युदर ३.५१ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (२५ मार्च) दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज ४७ नवे रुग्ण आढळले, तर ८ जण करोनामुक्त झाल्याने घरी गेले. त्यामुळे आतापर्यंत करोनाबाधितांची संख्या ६८१८, तर करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६३८४ झाली आहे. सध्या जिल्ह्यात २४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. करोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १८१ असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली. ओवळिये (ता. कणकवली) येथील ७५ वर्षीय महिलेचा मृत्यू आज झाला आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply