रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग लवकर पूर्ण होण्यासाठी पत्रकारांकडून आंदोलन

मुंबई-गोवा महामार्गाचे काम १७ वर्षांपासून रखडले असून, ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी रत्नागिरी तालुक्यातील निवळी येथे मराठी पत्रकार परिषदेकडून आंदोलन करण्यात आले.

मुंबई-गोवा महामार्ग डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार : शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई-गोवा महामार्गाचं एकंदर काम ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पूर्ण झालं असून, रायगड जिल्ह्यातला माणगाव-इंदापूर भाग वगळता या महामार्गाचा प्रकल्प डिसेंबर २०२५पर्यंत पूर्ण होणार असल्याची ग्वाही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

सर्वाधिक उजाड महामार्ग?

अनेक वर्षे रखडलेले मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आता अंतिम टप्प्यात आले आहे. पुढच्या वर्षीच्या डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण होऊन संपूर्ण महामार्ग खुला होईल, अशी ग्वाही केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. महामार्गाचे काम यथावकाश पूर्ण होईलच, पण महामार्गाची निर्मिती करण्यापूर्वी हा महामार्ग हरित महामार्ग होईल असे दिलेले आश्वासन मात्र पूर्ण होण्याबाबत शंका आहे. उलट कोकणासारख्या निसर्गसंपन्न भागातील हा महामार्ग देशभरातील सर्वांत उजाड महामार्ग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महामार्गावरचे वनीकरण

आता महामार्गाच्या दुतर्फा आणि मधोमध कोकणाच्या वातावरणाला पूरक अशी झाडे लावली गेली पाहिजेत. तसे सुरुवातीपासूनच सांगितले गेले आहे. सातत्याने त्याबाबतच्या सूचना करण्यात आल्या आहेत. उद्योजक आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे वनीकरण करून घ्यायचे असेल, तर ते स्थानिक स्वरूपातच होणार हे नक्की. त्यासाठी कोणताही कंत्राटदार नेमला जाणार नाही. म्हणूनच स्थानिक जातीची झाडे निवडणे आणि त्यांची लागवड करणे तसेच त्यांची जोपासना करणे ही कोकणवासीयांचीच जबाबदारी आहे. अन्यथा हा महामार्ग कोकणातून जाणारा तरीही उजाड महामार्ग ठरणार आहे.

जानेवारीपासून मुंबईतून गोवा साडेचार तासांत गाठता येणार – गडकरी

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गाचे काम यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. येत्या जानेवारीपासून मुंबई ते गोवा हे अंतर या महामार्गावरून साडेचार तासांत कापणे शक्य होईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

मुंबई-गोवा महामार्गाची नितीन गडकरी यांच्याकडून हवाई पाहणी

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ३० मार्च २०२३ रोजी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची (NH 66) हवाई पाहणी केली. त्या वेळी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत त्यांच्यासोबत होते.