स्वामी स्वरूपानंद जन्मोत्सवानिमित्त १८ डिसेंबरला रत्नागिरी-पावस पदयात्रा

रत्नागिरी : प. पू. स्वामी स्वरूपानंद जयंती उत्सवानिमित्त येत्या १८ डिसेंबर रोजी पहाटे साडेचार वाजता रत्नागिरीत जयस्तंभ येथून पदयात्रेला प्रारंभ होईल. पदयात्रेचे यंदाचे विसावे वर्ष आहे.

उत्सवातली खंडित झालेली परंपरा पुन्हा सुरू करणारं कुर्धे गाव

सुमारे ५० वर्षांपूर्वी काही कारणाने खंडित झालेली उत्सवातल्या टिपऱ्यांच्या खेळाची परंपरा पावसजवळच्या कुर्धे गावाने यशस्वीरीत्या पुनरुज्जीवित केली आहे. त्यात तरुणांचा मोठा सहभाग आहे. साप्ताहिक कोकण मीडियाच्या दिवाळी अंकात अनिकेत कोनकर यांनी लिहिलेल्या त्याविषयीच्या लेखाची ही एक छोटी झलक.

वाटूळचा शिमगोत्सव

रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातल्या वाटूळ या गावातला शिमगोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. या शिमगोत्सवाबद्दल विराज विलास चव्हाण यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

गोळपच्या हरिहरेश्वर मंदिरातला वैशिष्ट्यपूर्ण कार्तिकोत्सव

रत्नागिरी तालुक्यातल्या पावसजवळच्या गोळप गावात श्री हरिहरेश्‍वराचं म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश अशा तीन मूर्ती असलेलं दुर्मीळ मंदिर आहे. टिपर्‍या, पट्टे अशा खेळांसह या मंदिरात होणारा कार्तिकोत्सव वैशिष्ट्यपूर्ण असतो. त्या उत्सवाविषयी अविनाश काळे यांनी लिहिलेल्या लेखाला कोकण मीडियाच्या लेख स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्या लेखाची ही एक छोटी झलक.

गावखडीत यंदा समुद्री कासवांच्या दोन हजार पिल्लांचं संवर्धन

पावसजवळच्या गावखडीच्या (ता. जि. रत्नागिरी) समुद्रकिनाऱ्यावर गेली सात वर्षं ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या समुद्री कासवांचं संवर्धन केलं जात आहे. यंदाच्या हंगामात (२०२२) गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास दुप्पट म्हणजेच सुमारे २००० पिल्लं समुद्रात सोडण्यात आली आहेत.

व्हॉट्स अॅप ग्रुप शब्दकोडेप्रेमींनी सोडविले विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजांचे कोडे

रत्नागिरी : शब्दकोड्याच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमुळे आभासी पद्धतीने एकत्र आलेल्या सदस्यांनी समाजातील गरजू आणि गरीब विद्यार्थिनींच्या शैक्षणिक गरजांचे कोडे आर्थिक मदतीतून सोडविले आहे. कुर्धे (ता. रत्नागिरी) येथील ए. के. मराठे यांनी चालविलेल्या या ग्रुपमुळे अनेक विद्यार्थिनींना शैक्षणिक साहित्य मिळाले आहे.