रापण : कोकण किनारपट्टीचे सांस्कृतिक लेणे

सागराचे सान्निध्य लाभल्याने उकडा भात आणि माशाचे कालवण ही कोकणी माणसाची स्वर्गीय सुखाची थाळी. मग माशांचा प्रकार काहीही असो, कोकणी माणूस प्रत्येकाच्या आगळ्यावेगळ्या चवीला मानाचा मुजरा करून यथेच्छ उदरभरण करीत असतो. अर्थात मासे उड्या मारत ताटात कधीच येत नसतात. ते पकडण्यासाठी अनेक प्रकार आहेत. त्यात रापणीची मासेमारी म्हणजे एक संस्थानच! त्याचा रुबाब, त्याची अदब, सारेच आगळे आणि वेगळे! अलीकडे रापणीची ही संस्कृती कोकणच्या किनाऱ्यावरून अस्तंगत होत आहे. म्हणूनच या संस्कृतीच्या वेगळेपणापासून अर्थकारणापर्यंत आणि गीतांपासून नियमांपर्यंत अशा सर्व बाजूंची ओळख करून देणारा हा लेख… सुरेश ठाकूर यांच्या लेखणीतून…

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.

प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे अभिमानास्पद : भिसळे

चिंदर (ता. मालवण) : प्राथमिक शिक्षक हा मुळातच साहित्यिक असतो. मात्र अशा प्राथमिक शिक्षकाचे पुस्तक प्रकाशित होणे ही समस्त शिक्षणप्रेमींसाठी अभिमानास्पद बाब आहे, असे प्रतिपादन आचरे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष आणि सेवानिवृत्त शिक्षक बाबाजी भिसळे यांनी केले.

साने गुरुजी कथामालेचा नाथ पै युवाशक्ती पुरस्कार यशराज प्रेरणा युवा संघटनेला जाहीर

मालवण : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण तालुका शाखेचा बॅ. नाथ पै युवाशक्ती पुरस्कार मालवण तालुक्यातील आचरे येथील यशराज प्रेरणा या युवा संघटनेला जाहीर झाला आहे.

शिक्षणतज्ज्ञ जी. टी. गावकर शिक्षण सेवामयी पुरस्कार रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहीर

अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेच्या मालवण शाखेतर्फे दिला जाणारा थोर शिक्षणतज्ज्ञ जी. टी. गावकर सेवामयी शिक्षण पुरस्कार यंदा रश्मी रामचंद्र आंगणे यांना जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत त्या कार्यरत आहेत.

बॅ. नाथ पै जन्मशताब्दी : खासदार राऊतांकडून सिंधुदुर्गातील १३० वाचनालयांना ‘सिंधुसाहित्यसरिता’ची भेट

बॅ. नाथ पै यांची जन्मशताब्दी नुकतीच २५ सप्टेंबर २०२१ रोजी सुरू झाली. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, सिंधुसाहित्यसरिता हे पुस्तक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व १३० वाचनालयांना भेट पाठवण्याचा निर्णय खासदार विनायक राऊत यांनी घेतला आहे.