रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना सॅटर्डे क्लबचे निमंत्रण

रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने विविध उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्रीमंत होण्यासाठी मराठी उद्योजकांना सॅटर्डे क्लबतर्फे संवादाची संधी

रत्नागिरी : एकमेकां साह्य करू अवघे होऊ श्रीमंत असे ब्रीदवाक्य असलेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे येत्या शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) ऑनलाइन बैठक होणार आहे. ग्रॅण्ड व्हिजिटर्स डे अशी या बैठकीची संकल्पना असून राज्यभरातील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सॅटर्डे क्लबचे सदस्य नसलेल्या उद्योजकांनाही या बैठकीत सहभागी होता येणार आहे.

सॅटर्डे क्लबच्या ऑनलाइन बैठकीसाठी उद्योजकांना आवाहन

रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. १० ऑक्टोबर) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन बैठक होणार आहे. पाहुणे येती घरा अशी या बैठकीची संकल्पना आहे. बैठकीत उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी सॅटर्डे क्लबचा ८ ऑगस्टला व्हिजिटर्स डे

रत्नागिरी : महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट वर्षे प्रयत्न करत आहे. या क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन व्हिजिटर्स डे साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.