रत्नागिरी सॅटर्डे क्लबचा ८ ऑगस्टला व्हिजिटर्स डे

रत्नागिरी : महाराष्ट्रातील उद्योजकता वाढीस लागावी यासाठी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट वर्षे प्रयत्न करत आहे. या क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. ८ ऑगस्ट) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन व्हिजिटर्स डे साजरा केला जाणार आहे. त्यामध्ये रत्नागिरीतील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

इंजिनीयर माधवराव भिडे यांनी २००० साली सॅटर्डे क्लबची स्थापना केली. मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी या क्लबची स्थापना करण्यात आली. छोट्या-मोठ्या उद्योजकांनी एकत्र यावे, ही सॅटर्डे क्लबची संकल्पना आहे. ओळखीतून व्यवसाय वाढतो. आपल्या व्यवसायात वाढ करण्याची सुवर्णसंधी मिळते. एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसायाच्या वाढीला मदत करणारे मराठी उद्योजकांचे व्यासपीठ, अशी सॅटर्डे क्लबची ओळख आहे.

रत्नागिरीमध्येही या क्लबची शाखा आहे. या शाखेतर्फे दर पंधरा दिवसांनी येणाऱ्या शनिवारी बैठक घेतली जाते. करोनाच्या काळात या बैठका ऑनलाइन होत आहेत. झूम ॲपद्वारे या बैठका होत आहेत. येत्या शनिवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत झूम ॲपवरून होणाऱ्या बैठकीत रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क नाही. सहभागी होणाऱ्यांनी एका मिनिटात आपल्या व्यवसायाचा परिचय इतरांना करून द्यावयाचा आहे. रत्नागिरीतील जोशी फुड्सच्या कांचन चांदोरकर यावेळी त्यांच्या व्यवसायाविषयीचे दहा मिनिटांचे प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी शाखेचे अध्यक्ष विनोद वायंगणकर (७८४१८७२४३१), सचिव चंद्रकांत राऊत (९९२०४७५१७४) किंवा कोषाध्यक्ष मानसी महागावकर (९८९०९९१४०७) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply