रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना सॅटर्डे क्लबचे निमंत्रण

रत्नागिरी : सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टतर्फे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योजकांना व्यवसाय वाढविण्याच्या दृष्टीने विविध उद्योजकांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. एकमेकां साह्य करू अवघे होऊ श्रीमंत असे ब्रीदवाक्य असलेल्या या क्लबच्या रत्नागिरी शाखेतर्फे येत्या शनिवारी (दि. २८ नोव्हेंबर) सकाळी आठ ते दहा या वेळेत ऑनलाइन मोफत बैठक होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्या मोठ्या उद्योजकांनी सहभागी व्हावे आणि आपल्या उद्योगाच्या भरभराटीची संधी मिळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

एकत्र येऊन एकमेकांच्या व्यवसायाच्या वाढीला मदत करणारे मराठी उद्योजकांचे व्यासपीठ, अशी सॅटर्डे क्लबची ओळख आहे. रत्नागिरीमध्येही या क्लबची शाखा आहे. या शाखेमार्फत उद्योजकांची एकमेकांशी झालेल्या ओळखीतून कोट्यवधींची उलाढाल झाली असून अर्थातच उद्योजकांच्या उत्पन्नात भरीव वाढ झाली आहे.

रत्नागिरीतील सॅटर्डे क्लबच्या शाखेची बैठक दर महिन्याला दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी होते. करोनाच्या काळात या बैठका झूम ॲपद्वारे ऑनलाइन होत आहेत. येत्या शनिवारी सकाळी आठ ते दहा या वेळेत झूम ॲपवरून होणाऱ्या बैठकीत राज्यभरातील उद्योजक सहभागी होणार आहेत. आपल्या व्यवसायाचा उत्कर्ष साधून श्रीमंत व्हावे, असे वाटणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यातील छोट्या मोठ्या मराठी उद्योजकांनी या मोफत बैठकीत सहभागी व्हावे. त्यातूनच सॅटर्डे क्लबचे सदस्यत्व स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल, अशी खात्री बैठकीच्या आयोजकांना आहे.

अधिक माहिती आणि नावनोंदणीकरिता विनोद वायंगणकर (७८४१८७२४३१), सचिव चंद्रकांत राऊत (९९२०४७५१७४) किंवा खजिनदार सौ. मानसी महागावकर (९८९०९९१४०७) यांच्याशी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
…..
सॅटर्डे क्लबविषयी अधिक माहितीसाठी सोबतचे व्हिडिओ अवश्य पाहावेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply