लांजा : लांज्यातील गुरववाडीतील सतीमाता आदर्श युवक मंडळातर्फे आयोजित खुल्या गटातील गड-किल्ले स्पर्धेत प्रभानवल्ली-खैरवाडीतील युवा शिवशंभो कला मंडळाने साकारलेल्या प्रतापगड या किल्ल्याने प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत ३० स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच पार पडला. संकेत विलास घडशी याने साकारलेल्या रायगडाला द्वितीय क्रमांक, विशाल जयेश मसणे याने साकारलेल्या प्रतापगड किल्ल्याला तृतीय क्रमांक मिळाला. विजेत्या संघांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
अजित गोसावी, विशाल कांबळे यांनी स्पर्धेचे परिक्षण केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष गजानन गुरव आणि मारुती गुरव, किरण गुरव, अभिषेक गुरव, विवेक गुरव, बाबा धावणे, दत्ता घाग, सूरज गुरव आदी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Mediaशेअर करा...
Related
शेअर करा...
Related

