रॅन्कोज् कोकणात बंगला म्हणजे एक नैसर्गिक गावाकडचे घर…

रॅन्कोज् कोकणात बंगला ह्या आगळ्या वेगळ्या प्रकल्पामुळे अनेक ग्राहकांचे गावाकडील घर घेण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे, असा प्रकल्प जो तुमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करेल.

मानसिक तणावाच्या आजच्या जगात योगाची प्रत्येकाला नितांत गरज : राष्ट्रीय आयुर्वेद गुरू वै. मुरलीधर प्रभुदेसाई

आठव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त सावंतवाडी येथे २१ जून २०२२ रोजी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नवी दिल्लीचे राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ आणि सावंतवाडीतील सौ. माया चव्हाण यांचा योगसाधना वर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर रुजतोय नव्या आशेचा अंकुर

जैवविविधता कमी होतेय; डोंगर उघडेबोडके होताहेत; वानरं-माकडं, हत्तींपासून बिबट्यांपर्यंत अनेक वन्यजीव मानवी वस्तीत येताहेत अशी परिस्थिती कमी-अधिक फरकाने सगळीकडेच अनुभवायला मिळते आहे. त्यावर कोणते उपाय करता येतील, याबद्दल चर्चा झडत आहेत. नियतकालिकांची पानं आणि वेबसाइट्सची पेजेस याबद्दलच्या माहितीने भरभरून वाहत आहेत. ती परिस्थिती सुधारण्याच्या दृष्टीने प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे हात मात्र तुलनेने फारच थोडे आहेत. या मोजक्या हातांमध्ये समावेश होतो तो सावंतवाडीतले (जि. सिंधुदुर्ग) अँड्र्यू फर्नांडिस आणि त्यांचे दोन मुलगे डॅनियल आणि फ्रँकलीन यांचा.

करोनाग्रस्तांसाठी जनकल्याण समितीचे मोफत सल्ला केंद्र

सावंतवाडी : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सिंधुदुर्ग जिल्हा शाखेतर्फे करोनाबाधित रुग्णांकरिता डॉक्टरांचे एक पथक विविध विषयांवरील मोफत सल्ल्यासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महिला दिनानिमित्त `धनलाभ`तर्फे अर्थसाक्षरतेच्या खास सूचना

महिलांमध्ये अर्थसाक्षरता असल्याचे जाणवत नाही. महिलांनी अर्थसाक्षर व्हावे, यासाठी काही प्राथमिक सूचना सावंतवाडीच्या `धनलाभ`तर्फे करण्यात येत आहेत.

सावंतवाडीतील आंबेडकरांची आठवण प्रेरणाभूमीत रूपांतरित करण्याचा निर्धार

सावंतवाडी : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या त्या पुण्यभूमीचे प्रेरणाभूमीत रूपांतर करण्याचा निर्धार आज येथे घेण्यात आला. याबाबत अनुयायांनी याठिकाणी बैठक घेतली.