महिला दिनानिमित्त `धनलाभ`तर्फे अर्थसाक्षरतेच्या खास सूचना

दरवर्षी ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. यावर्षीचा महिला दिन या दशकातील पहिला महिला दिन आहे. सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत, असे दिसत असूनही अनेक महिलांमध्ये अर्थसाक्षरता असल्याचे जाणवत नाही. महिलांनी अर्थसाक्षर व्हावे, यासाठी काही प्राथमिक सूचना सावंतवाडीच्या धनलाभ`तर्फे करण्यात येत आहेत.
……………..

बहुतांश महिला त्यांचे आर्थिक व्यवहार पाहत नाहीत, ही समस्या आहे. याच वेळी दीर्घकालीन निर्णय आणि आर्थिक नियोजन यापासून महिला दूर राहतात. महिलांना दीर्घकालीन आर्थिक नियोजनाचा आत्मविश्वालस आणि अनुभव नसणे अथवा पतीकडून स्वातंत्र्य न मिळणे अथवा पालकांकडून त्यांच्यातील या नैसर्गिक क्षमतेला डावलले जाणे, ही यामागील कारणे असतात. खूप आधीपासून भारतीय महिला या बचत करणाऱ्या आणि खर्चाचे व्यवस्थापन करणाऱ्या आहेत, हे माहीत असूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे.

म्हणूनच महिलांनी काही गोष्टी केल्यास हे क्षेत्रसुद्धा त्यांच्या अधिपत्याखाली येऊ शकते.
त्याची सुरुवात अशी करा –

 • स्वतःवर आणि तुमच्या वित्तीय व्यवस्थापन क्षमतेवर विश्वास ठेवा.
 • बचत आणि छोट्या खात्यांचे व्यवस्थापन करून सुरवात करा.
 • `नॉलेज इज की’ (ज्ञान हीच गुरुकिल्ली) आहे. तुमचे आर्थिक ज्ञान वाढवा आणि स्वतःला अपडेट करा. तुमचा खर्च, गुंतवणुकीचे नियोजन करू शकणाऱ्या मोबाइल अॅप्सचा वापर करा अथवा वित्तीय सल्लागाराची मदत घ्या.
 • बचत तशीच पाडून ठेवू नका. भारतीय महिलांनी बचत केलेला पैसा घरात ठेवण्यापेक्षा गुंतवायला हवा.
 • अल्पकालीन वित्तीय उद्दिष्टे ठरवा! कारण ती तुम्ही गाठल्यानंतर तुमचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढेल.
 • कुटुंबातील आर्थिक निर्णयात महिलांनी सहभागी व्हावे.
 • तुमचे उत्पन्न, खर्च आणि तुम्ही प्रत्यक्षात किती बचत करू शकता, याचा विचार करून वास्तवदर्शी वित्तीय नियोजन करा.
  यासाठी सर्व महिलांना शुभेच्छा!!
 • प्रदीप जोशी
 • धनलाभ, सावंतवाडी
 • (संपर्क 9422429103)
 • https://dhanlabh.in/
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply