झोंपाळ्यावरची गीता आणि इंग्रजी अनुवाद – अध्याय दहावा – भाग ४

खासकरून लहान मुलींना सहज समजेल आणि त्यांच्याकडून पुढच्या पिढीवर चांगले संस्कार होतील, या हेतूने दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय यांनी १९१७मध्ये सुलभ मराठीत झोंपाळ्यावरची गीता लिहिली. रत्नागिरीतील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांनी या गीतेचा इंग्रजी अनुवाद केला आहे. झोंपाळ्यावरची गीता आणि तिचा अनुवाद, तसेच मूळ संस्कृत भगवद्गीतेतील काही श्लोक गीता जयंतीपासून येथे दररोज क्रमशः प्रसिद्ध केले जात आहेत.
…..

झोंपाळ्यावरची गीता – अध्याय दहावा : विभूतियोग

कोण्या वस्तुरूपीं । तुजशीं मीं घ्यावें ।।
तुज ओळखावें । केवीं तैसें ।।१३।।

सांग तुझा योग । तैशाच विभूती ।।
हेंच मी श्रीपती । मागें तुशीं ।।१४।।

अनंत विभूती । नाहीं तयां मिती ।।
अंगीं केश किती । कोण सांगे?।।१५।।

मुख्य मुख्य कांहीं । सांगूनीया तूज ।।
पुरवितों चोज । तुझें आतां ।।१६।।

Chapter 10 – The Divine Grace

What are the things । Should I recognize ।
And I realize । That you stay in ।।13।।

What concatenation । And wonderful relation ।
Lays behind expression । Of these forms ।।14।।

Masses limitless । Forms numberless ।
As such countless । Is the hair ।।15।।

Listen which are । Appearances major ।
Obtain the answer । Of your query ।।16।।

(झोंपाळ्यावरची गीता – दत्तात्रेय अनंत आपटे उर्फ अनंततनय
इंग्रजी अनुवाद – राजेंद्रप्रसाद मसुरकर)

……..

श्रीमद्भगवद्गीता (मूळ – संस्कृत)
अथ दशमोऽध्यायः । विभूतियोगः

अर्जुन उवाच ।

कथं विद्यामहं योगिंस्त्वां सदा परिचिन्तयन् ।
केषु केषु च भावेषु चिन्त्योऽसि भगवन्मया ॥ १०-१७॥

विस्तरेणात्मनो योगं विभूतिं च जनार्दन ।
भूयः कथय तृप्तिर्हि श‍ृण्वतो नास्ति मेऽमृतम् ॥ १०-१८॥

श्रीभगवानुवाच ।

हन्त ते कथयिष्यामि दिव्या ह्यात्मविभूतयः ।
प्राधान्यतः कुरुश्रेष्ठ नास्त्यन्तो विस्तरस्य मे ॥ १०-१९॥

(क्रमशः)
(झोंपाळ्यावरची गीता हा भगवद्गीतेचा समश्लोकी अनुवाद नाही. त्यामुळे मूळ संस्कृत श्लोक केवळ संदर्भासाठी सोबत देत आहोत.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा. आधीचे सर्व श्लोक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे सत्त्वश्री प्रकाशनाचे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

(‘झोंपाळ्यावरची गीता’ हे पुस्तक ई-बुक स्वरूपात खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply