रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाच्या चाचण्यांवर भर देण्यात आला आहे. आज ७६३ चाचण्या घेण्यात आल्या. त्यापैकी १३ जणांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. जिल्ह्यातल्या करोनाबाधितांची संख्या दहा हजार १११ झाली आहे. आज ८ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात नवे ९ बाधित आढळले, तर १३ जण करोनामुक्त झाले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे १३ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यात प्रत्येकी ४, तर रॅपिड अँटिजेन टेस्टनुसार संगमेश्वर तालुक्यात १ बाधित आढळला. (दोन्ही मिळून १३). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता १० हजार १११ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी ७५० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून आतापर्यंत ८४ हजार ३४९ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १६१ आहे. त्यातील सर्वाधिक ५४ रुग्ण रत्नागिरीच्या महिला रुग्णालयात दाखल आहेत, तर ६८ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ८ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९५४९ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९४.४४ टक्के आहे.
जिल्ह्यात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३६७ असून जिल्ह्याचा मृत्युदर ३.६३ टक्के आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थिती
सिंधुदुर्गात आज (७ मार्च) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे १२ करोनाबाधित आढळले, तर २ रुग्ण करोनामुक्त झाले. करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६५११ झाली आहे. आतापर्यंत करोनामुक्त झालेल्यांची एकूण संख्या ६१५३ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७४ आहे.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media
