रत्नागिरीत १२ ते १८ मार्चपर्यंत पतंजली योग विज्ञान शिबिर

रत्नागिरी : हरिद्वार येथील पतंजली योगसंस्था आणि ॐ साई मित्र मंडळातर्फे प. पू. योगगुरू रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण द्वारा प्रणित मोफत योग विज्ञान शिबिर रत्नागिरीत येत्या १२ ते १८ मार्च या कालावधीत रत्नागिरीत आयोजित करण्यात आले आहे.

औषधाशिवाय आरोग्य आणि आरोग्यम्‌ धनसंपदा या उक्तीनुसार स्त्रीपुरुष सर्वांनाच दररोज प्राणायाम, योगासने आणि सूर्यनमस्कार अशी योगसाधना आणि सराव केल्यास उत्तम आरोग्य सांभाळणे शक्य आहे. ते लक्षात घेऊनच ॐ साई मित्रमंडळातर्फे गेली १२ वर्षे दररोज सकाळी पावणेसहा ते सव्वासात या वेळेत योगकक्षा अवितरपणे चालू आहे. हजारो लोकांनी त्याचा लाभ घेतला आहे. योगसरावामध्ये दररोज यौगिक जॉगिंग (१० मिनिटे), आठ मूलभूत प्राणायाम (४५ मिनिटे), संपूर्ण शरीराचे सूक्ष्म व्यायाम (१५ मिनिटे), संपूर्ण शरीराला आवश्यक विविध योगासने (१० मिनिटे) आणि संगीताच्या तालावर १३ सूर्यनमस्कार (१० मिनिटे) असा दररोज दीड तासाचा परिपूर्ण सराव करवून घेतला जातो. इतरत्र हजारो रुपये मोजून आयोजित केले जाणारे अशा तऱ्हेचे योग शिबिर ॐ साई मित्रमंडळातर्फे मोफत चालविले जाते. माणसाकडे संपत्ती किती, जमीन किती, गाड्या किती, नोकर-चाकर किती याची मोजदाद केली जाते, पण आरोग्य उत्तम नसेल तर या कशाचाही उपभोग घेता येऊ शकत नाही. याचाच विचार करून स्वामीजींच्या आज्ञेप्रमाणे भारतातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवून त्याचे आरोग्य उत्तम आणि निरोगी घडवायचे आहे. त्यासाठी हा यज्ञ आहे. याच भावनेतून योगशिबिर चालविले जाते.

त्याच अनुषंगाने येत्या १२ मार्च ते १८ मार्च २०२१ या कालावधीत दररोज सकाळी पावणेसहा ते सव्वासात वाजेपर्यंत शिबिर होईल. त्यानंतर दररोजचा सरावही सुरू राहील.

ॐ साई मंडळ सांस्कृतिक भवन (नाचणे-साळवी स्टॉप लिंक रोड, रत्नागिरी) येथे हे शिबिर होणार आहे. पुरुषांनी टी शर्ट पॅण्ट आणि महिलांनी पंजाबी ड्रेस परिधान करावा, असे सूचित करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी नावनोंदणीसाठी योगशिक्षक अनंत आगाशे (७०८३१६२९७५) यांच्याशी संपर्क साधावा. कोविडचे नियम पाळून फक्त केवळ ३० व्यक्तींचीच नोंदणी शिबिरासाठी केली जाणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply