उद्योजक
मी सागर विनोद वायंगणकर. उज्ज्वला केटरर्स म्हणून आम्ही सेवा पुरवितो.
केटरिंगचा व्यवसाय २०१९ साली सुरू केला, पण हॉटेल व्यवसायामध्ये ३१ वर्षांपासून आहोत. त्याचे नाव हॉटेल वायंगणकर.
हा व्यवसाय सुरू करण्याआधी अनुभव काही नव्हता. व्यवसाय सुरू झाल्यानंतर हळुहळू अनुभव येत गेला. व्यवसाय व्हा सुरू केला, तेव्हा वडील विनोद वायंगणकर तो सांभाळत होते. त्यांच्या हाताखाली मी काम शिकत होतो.
या व्यवसायातील १०० टक्के उत्पादने आमची स्वतःचीच आहेत. हॉटेलमध्ये आम्ही विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची सेवा देतो. तसेच केटरिंगच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कार्यक्रमांमध्ये भोजनाची व्यवस्था आम्ही करतो.
नाचणे आणि मिरजोळे ग्राममपंचायत, जिल्हा क्रीडा कार्यालय, काही नाट्यसंस्था, कस्टम ऑफीस, रत्नागिरीला येणारे पर्यटक हे आमचे प्रमुख ग्राहक आहेत. आम्ही रत्नागिरी शहरातील सर्व भागात सेवा देतो.
रत्नागिरीत आम्ही बहुतांश अशा पर्यटनस्थळी भोजनाची व्यवस्था करतो. त्यामुळे पर्यटकांना वनभोजनाचा आनंद घेता येतो आणि म्हणूनच रत्नागिरीला येणारे पर्यटक, शाळा-कॉलेजच्या सहली हे आमचे प्रमुख ग्राहक आहेत.
आमची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे
१) पहाटे ५.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत सेवा.
२) स्वादिष्ट वडा, रोज खावी अशी मिसळ, त्याचसोबत आंबोळी, घावन आणि बरेच अस्सल कोकणी पदार्थ आमच्याकडे उपलब्ध असतात.
३) माफक दरामध्ये उत्तम चव आणि घरपोच सेवा आम्ही देतो.
अवश्य भेट द्या, संपर्क साधा.
- सागर विनोद वायंगणकर,
उज्ज्वला केटरर्स, हॉटेल वायंगणकर,
मारुती मंदिर, रत्नागिरी
(संपर्क क्रमांक : 97696 38327)

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड