मालवण : रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेने संपादित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तकाच्या खरेदीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
मालवण : रत्नागिरीच्या सत्त्वश्री प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या येथील शाखेने संपादित केलेल्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ पुस्तकाच्या खरेदीला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना खरेदीसाठी मान्यता देण्यात आली आहे.
आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील श्री देव रामेश्वर संस्थानची डाळपस्वारी दर तीन वर्षांनी येते. यंदाची डाळपस्वारी २५ फेब्रुवारी ते दोन मार्च २०२१ या कालावधीत होणार आहे. यंदाच्या डाळपस्वारीवर करोनाचे सावट असले, तरी हा उत्सव नवे चैतन्य देणारा असतो. त्या निमित्ताने, डाळपस्वारी या वैशिष्ट्यपूर्ण उत्सवाबद्दल ज्येष्ठ लेखक सुरेश ठाकूर यांनी लिहिलेला हा लेख…
आचरा (ता. मालवण) : रामेश्वराचं देऊळ नाही, असं गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडणं कठीण. मालवण-रत्नागिरी सागरी मार्गानजीक वसलेल्या कांदळगाव या टुमदार गावीदेखील असं रामेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या निकट झाडांच्या गर्दीत लपलेल्या एका घराच्या अंगणात रविवारी सायंकाळी (दि. ७ फेब्रुवारी) रंगला एक देखणा साहित्यिक सोहळा.
माणगाव आणि आचरा (जि. सिंधुदुर्ग) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणाऱ्या ‘सिंधुसाहित्यसरिता’ या पुस्तकाचे नुकतेच सिंधदुर्ग जिल्ह्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी अनोख्या पद्धतीने उद्घाटन झाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रतिभावान, मात्र फारशा परिचित नसलेल्या साहित्यिकांची ओळख करून देणारे ‘सिंधुसाहित्यसरिता’ हे पुस्तक आज, देवदीपावलीच्या मुहूर्तावर प्रकाशित होत आहे. ‘कोमसाप-मालवण’चे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून उत्साही सदस्यांनी सिंधुसाहित्यसरिता अक्षरमंच नावाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘सिंधुसाहित्यसरिता’ लेखमाला करोना लॉकडाउनच्या कालावधीत प्रसिद्ध केली. त्या लेखमालेची सुधारित आवृत्ती सत्त्वश्री प्रकाशन अर्थात कोकण मीडियाने पुस्तक रूपात आणि ई-बुक रूपात प्रकाशित केली. (पुस्तक खरेदीची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.) त्या निमित्ताने, पुस्तकाचे संपादक सुरेश ठाकूर आणि प्रकाशक प्रमोद कोनकर यांचे हे मनोगत…
मालवण : सुरेश श्यामराव ठाकूर यांनी लिहिलेल्या ‘शतदा प्रेम करावे’ या पुस्तकाचे क्रमशः अभिवाचन करण्याचा उपक्रम कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू झाला आहे. सुरेश ठाकूर हे आचरा (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील ज्येष्ठ लेखक आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आहेत. हा उपक्रम नऊ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, दर सोमवार,बुधवार आणि शुक्रवारी सायंकाळी सात वाजता अभिवाचन सादर होत आहे.