स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धा

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या १४० व्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन सोमवार, दि. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता ऐतिहासिक पतितपावन मंदिरात केले आहे.

रत्नागिरीत १२ एप्रिलला सायंकाळी सावरकर गौरव यात्रा

रत्नागिरी शहरामध्ये बुधवारी, १२ एप्रिल २०२३ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

देवरूख, राजापूर, रत्नागिरीत स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख, राजापूर आणि रत्नागिरी या ३ ठिकाणी सावरकर गौरव यात्रा निघणार असल्याची माहिती भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.

सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद जगवला पाहिजे : डॉ. अशोकराव मोडक

रत्नागिरी : कम्युनिस्ट, डाव्यांच्या रशियाला अजूनही युक्रेनवर निर्णायक विजय मिळवता आलेला नाही. दोन्ही देशांचे मूळ एकच आहे. परंतु परकीय निष्ठा सांगणाऱ्या कम्युनिस्ट राष्ट्रवादाचा पराभव होत आहे. त्याच वेळी वीर सावरकरांनी सांगितलेला सांस्कृतिक राष्ट्रवाद आजच्या काळात महत्त्वाचा आहे. तो आपण साऱ्यांनी जगवला पाहिजे, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. अशोक मोडक यांनी केले. भाजपाचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी लिहिलेल्या ‘डाव्यांचा खरा चेहरा’ या पुस्तकाचे प्रकाशन केल्यावर ते बोलत होते.

सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग ४ – ध्येयनिष्ठा, स्त्री-सबलीकरण

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे, दुसऱ्या भागात आर्थिक इम्युनिटीबद्दलचे, तर तिसऱ्या भागात नागरिकांच्या शारीरिक-मानसिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजच्या या लेखमालेच्या शेवटच्या भागात पाहू या सावरकरांची प्रतिभाशक्ती, ध्येयनिष्ठा, स्त्री-सबलीकरण आणि अन्य विचार…

सर्वसमावेशक इम्युनिटीसाठी सावरकर विचार : भाग ३ – शारीरिक-मानसिक

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेल्या विचारांना, त्यांच्या कृतींना समाजात प्रतिकारशक्ती विकसित होण्याच्या विचाराची पार्श्वभूमी कशी होती, याचा आढावा घेणाऱ्या लेखमालेच्या पहिल्या भागात आपण सावरकरांचे सामाजिक इम्युनिटीबद्दलचे, तर दुसऱ्या भागात आर्थिक इम्युनिटीबद्दलचे विचार पाहिले. आजचा तिसरा भाग नागरिकांच्या शारीरिक-मानसिक इम्युनिटीबद्दलच्या विचारांचा…