प्रत्येक गाव व्हावे पुस्तकांचे गाव

संपूर्ण कोकणातील प्रत्येक गाव पर्यटनस्थळ आहे, असे म्हटले जाते. तसेच निसर्गसौंदर्य प्रत्येक गावाला मिळाले आहे. मात्र पर्यटक प्रत्येक गावाला भेट देईलच, अशी शक्यता नाही. ऐतिहासिक आणि पौराणिक संदर्भ असलेली अनेक गावे कोकणात आहेत. या गावांना पर्यटक भेटी देत असतात. पण त्या स्थळाविषयीची माहिती त्यांना एकत्रितरीत्या उपलब्ध होत नाही. सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात ही माहिती पर्यटक वेगवेगळ्या माध्यमांमधून मिळवत असतात. मात्र ती सर्व माहिती अचूक असेलच असे नाही. मालगुंड हे गाव पुस्तकांचे गाव म्हणून जाहीर झाल्यानंतर आता या गावाच्या पुढाकाराने ही वस्तुस्थिती लक्षात घेतली पाहिजे.

रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळास पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा पर्यावरण मंडळाला पर्यावरण जनजागृती पुरस्कार प्रदान करण्यात आला.

महाराष्ट्रातील आठ हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहितीपुस्तिका पोस्टाकडून प्रकाशित

महाराष्ट्रातील वारसा असलेल्या आठ बारव अर्थात हेरिटेज स्टेपवेल्सची पोस्टकार्ड्स आणि माहिती पुस्तिका पोस्टाने प्रकाशित केली आहे.

कोकणला पर्यटन नियामक प्राधिकरण हवे : धीरज वाटेकर

खेड : कोकणच्या प्राकृतिक सौंदर्याची कठोर काळजी घेणाऱ्या पर्यटन नियामक प्राधिकरणाची नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन लेखक आणि पर्यटन-पर्यावरण क्षेत्रातील कार्यकर्ते धीरज वाटेकर यांनी केले.

शिर्डीतील पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्याचा सहभाग

चिपळूण : शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या निसर्ग आणि सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ आणि श्रीसाईबाबा संस्थान ट्रस्ट यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या सहाव्या पर्यावरण संमेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यावरणप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग होता.

शालेय अभ्यासक्रमात पावसाच्या दोलायमानतेचा विषय आवश्यक : डॉ. माधवराव चितळे

चिपळूण : शालेय अभ्यासक्रमातील भूगोल हा विषय पावसाच्या दोलायमानतेसारख्या विचाराशी जोडला जायला हवा. हे शिकवले न गेल्याने पाण्याच्या व्यवस्थापनाचे पुरेसे गांभीर्य आपल्याकडे रुजले नसल्याचे मत डॉ. माधवराव चितळे यांनी व्यक्त केले.