चिपळूण : देवराई, देवक वृक्ष आणि ४०-५० वर्षांहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री संबोधून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम झाले पाहिजे, अशी विनंती पर्यावरण आणि पर्यटन विषयातील कार्यकर्ते लेखक धीरज वाटेकर यांनी केली.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
चिपळूण : देवराई, देवक वृक्ष आणि ४०-५० वर्षांहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री संबोधून त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनावर काम झाले पाहिजे, अशी विनंती पर्यावरण आणि पर्यटन विषयातील कार्यकर्ते लेखक धीरज वाटेकर यांनी केली.
भारतात ‘सदर्न बर्डविंग’ या फुलपाखरानंतर सर्वांत मोठे फुलपाखरू असल्याचा मान मिळालेले, महाराष्ट्राचे ‘राज्य फुलपाखरू’ ‘ब्लू मॉरमॉन’ १० एप्रिल २०२२ रोजी चिपळूण येथे दिसले. त्याचे छायाचित्र टिपल्यानंतर व्यक्त केलेल्या भावना.
कोकणातल्या वाशिष्ठी खाडीच्या निसर्गरम्य किनाऱ्यावर वसलेल्या मालदोली गावात १९२० च्या आसपास उभारण्यात आलेली आणि पर्यटनात शास्त्रीय वेगळेपणा जपणारी ‘रामचंद्र वासुदेव मराठे न्यास’ ही हेरिटेज वास्तू येत्या रविवारी (२४ ऑक्टोबर २०२१) वृद्धांचे ‘आनंदाश्रम’ बनून नव्याने सर्वांच्या समोर येत आहे. या वैशिष्ट्यपूर्ण वास्तूबद्दल आणि वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमाबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला लेख…
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून कोविड बालरुग्णालय उभारून पूर्वतयारी केली. या स्वरूपाचे हे राज्यातील पहिलेच केंद्र ठरेल, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी केले.
रत्नागिरी : रत्नागिरीतील २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि ओणी (ता. राजापूर) येथील ३० खाटांचे रुग्णालय अशा दोन रुग्णालयांचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येणारे पर्यटक दोन-चार दिवसांसाठी राहिले, तर जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार मिळेल. तसेच पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, हे लक्षात घेऊन पर्यटन धोरण आखले जाईल, अशी ग्वाही रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. अनिल परब यांनी दिली. रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेने आयोजित केलेल्या वारसा पर्यटन या विषयावरील तिसऱ्या शाश्वत पर्यटन परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.