कोरोना संसर्गवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवे कडक निर्बंध

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्गाचा वाढता प्रसार पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने १० जानेवारीपासून नवे निर्बंध लागू करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार पहाटे ५ ते रात्री ११ वाजेपर्यंत ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरता येणार नाही. तसेच, रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता कुणालाही प्रवास करता येणार नाही.

विवाह आणि अन्य कार्यक्रमांना फक्त ५० व्यक्तीच उपस्थित राहू शकणार; राज्यात नवे कोविड निर्बंध लागू

राज्यात कोविड आणि ओमायक्रॉनचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्नसमारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा 50 केली असून, अंत्यसंस्कारासाठी केवळ 20 व्यक्तींना उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे. हे निर्बंध 31 डिसेंबर 2021च्या रात्री 12:00 वाजल्यापासून अंमलात आले आहेत.

सूडाच्या राजकारणात कोकणाची होरपळ

साप्ताहिक कोकण मीडियाच्या २७ ऑगस्टच्या अंकाचे संपादकीय

सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट, अनेक सवलती

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला असून सिंधुदुर्ग जिल्हा करोना अनलॉकच्या स्तर ३ मध्ये समाविष्ट झाला आहे. त्यामुळे जिल्ह्याकरिता निर्बंधांमध्ये काही सवलती लागू केल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी आज दिले.

महाराष्ट्रात ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू

मुंबई : करोनाच्या प्रतिबंधासाठी राज्यात ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हिटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज ३० मे रोजी रात्री समाजमाध्यमावरून केलेल्या भाषणात ही माहिती दिली.

रत्नागिरी जिल्ह्यात करोनासाठी वाढीव २३० खाटांची दोन रुग्णालये

रत्नागिरी : रत्नागिरीतील २०० खाटांचे महिला रुग्णालय आणि ओणी (ता. राजापूर) येथील ३० खाटांचे रुग्णालय अशा दोन रुग्णालयांचे ऑनलाइन उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले.