आतापर्यंत करोना रुग्णांची संख्या मर्यादित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या करोनाबाधितांच्या संख्येत आज (२९ मे) एकदम १५ रुग्णांची वाढ झाली. २८ मे रोजी रात्री सहा, तर २९ मे रोजी नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ३९ झाली असून, ३० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २९ मे) सकाळपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये १२ करोनाबाधित रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील बाधितांची संख्या २०८ झाली आहे. रत्नागिरीतील करोनाबाधित गावांची यादीही आज जाहीर करण्यात आली.
Like this:
Like Loading...