कर्दे मराठी शाळा दापोली तालुक्यात प्रथम

दापोली : मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत कर्दे (ता. दापोली) येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मनोज भाटवडेकर यांना सायकल गौरव पुरस्कार

दापोली : येथे झालेल्या तिसऱ्या रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलनात चिपळूण सायकलिंग क्लबचे मनोज भाटवडेकर यांना सायकल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

चंद्रनगरची आरोही इस्रोच्या मुलूखगिरीवर

दापोली : दापोली तालुक्यातील चंद्रनगर या छोट्याशा गावातील आरोही मुलूख ही विद्यार्थिनी इस्रोच्या मुलूखगिरीवर रवाना झाली आहे.

दापोलीत १४ जानेवारीला तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन

दापोली : तिसरे रत्नागिरी जिल्हा सायकल संमेलन येत्या १४ जानेवारी रोजी दापोली येथे होत आहे. त्यामध्ये १० ते १३ जानेवारी सायकल चित्रपट महोत्सव असणार आहे.

दिव्यांग व्यक्तींना प्रोत्साहन देण्यासाठी दापोलीत निघाली सायकल फेरी

दिव्यांगांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांच्या उद्धारासाठी हातभार लागावा, तसेच समाजातील अन्य नागरिकांना प्रेरणा मिळावी याकरिता जनजागृतीसाठी आज, (३ डिसेंबर २०२३) जागतिक दिव्यांग दिनानिमित्त, दापोली सायकलिंग क्लबतर्फे सायकल फेरी काढण्यात आली.

दिव्यांग व्यक्तींच्या प्रोत्साहनार्थ दापोलीत रविवारी सायकल फेरी

दापोली : शारीरिक किंवा मानसिक त्रुटीद्वारे विकलांग बनलेल्या समाजातील घटकांच्या समस्या समजावून घेता याव्यात, म्हणून उद्या, ३ डिसेंबर या जागतिक दिव्यांग दिवसाच्या निमित्ताने दापोली सायकलिंग क्लबने सायकल फेरीचे आयोजन केले आहे.