लॉकडाउनच्या काळात कोकणचा निसर्ग कुंचल्यातून उतरला कागदावर

पावसाळ्यात कोकणचा निसर्ग सर्वांनाच भुरळ पाडतो. पावसाच्या सरींनी सर्वत्र उगवणारे हिरवे अंकुर आणि शेतीच्या कामात मग्न असणारे शेतकरी कुटुंब असे सारे दृश्य नजरेचे पारणे फेडणारे असते. लॉकडाउनच्या काळात कोकणचा हा निसर्ग कलाशिक्षक विष्णू गोविंद परीट यांनी आपल्या कुंचल्यातून बहारदारपणे कागदावर उमटवलाय. परीट यांची चित्रे पाहून अक्षरशः थक्क व्हायला होते.

‘आम्ही ‘असे’ करोनामुक्त झालो!’ – रत्नागिरी जिल्ह्यातील दाम्पत्याचा अनुभव

करोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. पण सकारात्मक मानसिकता ठेवली, तर प्रत्यक्ष करोनाशी लढा देणे कठीण नाही. कसे, ते सांगणारा करोनामुक्त झालेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील जोडप्याचा हा अनुभव.

देवरूखच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले किफायतशीर, सुखकर फेस शील्ड

देवरूख : करोना संसर्गप्रतिबंधक फेस शील्ड तयार करून देवरूख आणि परिसरातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या सुटीचा सदुपयोग केला आहे. करोना प्रतिबंधासाठी आवश्यक असलेल्या प्रचलित फेस शील्डमध्ये असलेले दोष दूर करून त्यांनी हे फेस शील्ड तयार केले आहे. शिवाय ते किफायतशीर किमतीत उपलब्ध करून दिले आहे.

धामापूरमधील अपंगांच्या २२ कुटुंबांना अवघ्या एका व्हॉट्सअॅप मेसेजवर मदत

व्हॉट्सअॅपवरच्या एका मेसेजवर धामापूर तर्फ संगमेश्वर (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील २२ अपंगांच्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत रत्नागिरीतून पाठविण्यात आली.