धामणी येथे आज ज्ञानेश्वर ७२५ व्या संजीवनसमाधीनिमित्ताने `इंद्रायणी काठी`

संगमेश्वर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधीनिमित्ताने कलांगण संगमेश्वर या संस्थेने आज (१४ नोव्हेंबर) इंद्रायणी काठी हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

देवरुखवासीयांच्या दसऱ्याच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी

करोना, लॉकडाउन आणि अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना नियम पाळून का होईना, पण दसरा उत्साहाने साजरा करायचा होता; देवरुख (ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) येथील नागरिकांना मात्र ते शक्य झाले नाही. कारण आधीच लांबलेल्या पावसाने साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याचाही मुहूर्त चुकवला नाही. त्यामुळे नागरिकांच्या उत्साहावर मुसळधार पावसाचे पाणी पडले आणि सोने लुटणे सोडाच, पण पावसानेच जणू देवरुखवासीयांना लुटले, अशी भावना लोकांच्या मनात निर्माण झाली होती.

कोकणातील पहिले कौशल्य प्रशिक्षण केंद्र देवरूखला सुरू होणार

देवरूख : कोकणातील मुलांना रोजगाराची संधी मिळवून देणारे कोकणातील पहिलेच कौशल्य प्रशिक्षण केंद्र येथील आठल्ये, सप्रे, पित्रे स्वायत्त महाविद्यालयात सुरू होणार आहे. या अभ्यासक्रमाचा प्रारंभ येत्या २६ ऑक्टोबरला होणार आहे.

ज्येष्ठ पत्रकार डॉ. एम. डी. शेकासन यांचे निधन

संगमेश्वर : गेली ४५हून अधिक वर्षे आपल्या लेखणीने समाजाभिमुख पत्रकारिता चळवळ जागृत ठेवणारे ज्येष्ठ पत्रकार आणि समाजवादी विचारसरणीचे कार्यकर्ते डॉ. एम. डी. शेकासन (७४) यांचे आज (नऊ ऑक्टोबर २०२०) रत्नागिरीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

मुंबई-गोवा महामार्ग १० ते १२ सप्टेंबरपर्यंत काही काळ बंद

राष्ट्रीय महामार्ग विभागाने सूचित केल्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीवरील दोन्ही पूल तसेच संगमेश्वरजवळील शास्त्री पूल या पुलांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने स्ट्रक्चरल ऑडिट केले जाणार आहे. त्याकरिता या दोन्ही पुलांवरील वाहतूक १० ते १२ सप्टेंबर या कालावधीत बंद राहणार आहे.

देवरुख-संगमेश्वरात २५ हजार गणेशमूर्तींचे शांततेत विसर्जन; गौरींनाही निरोप

देवरुख : करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव भाविकांनी अत्यंत साधेपणाने आणि नियम व अटींचे पालन करून साजरा केला. देवरुखात आज (२७ ऑगस्ट) पाच दिवसांच्या गणपतींना, तसेच गौरींनाही शांततेत निरोप देण्यात आला. देवरुख परिसरात १२ हजार व संगमेश्वर परिसरात १३ हजार घरगुती गणेशमूर्तींचे आज विसर्जन झाले.