गझलकार मधुसूदन नानिवडेकरांच्या प्रथम स्मृतिदिनी आचऱ्यात ‘कोमसाप-मालवण’तर्फे ‘मधुरांजली’

आचरे : प्रसिद्ध गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा पहिला स्मृतिदिन ११ जुलै २०२२ रोजी आहे. त्याच्या पूर्वसंध्येला आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथे ‘मधुरांजली’ या साहित्यिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रविवारी, १० जुलै २०२२ रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम बागजामडूल-आचरे येथील जामडूल रिसॉर्टमध्ये होणार आहे.

आचऱ्यात साने गुरुजी पुण्यतिथीनिमित्त विविध उपक्रम

आचरा : अखिल भारतीय साने गुरुजी कथामालेची मालवण शाखा आणि मालवणचे बॅ. नाथ पै सेवांगण यांच्या संयुक्त विद्यमाने आचरे (ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) येथील बिडये विद्यामंदिर अर्थात केंद्रशाळा आचरे नं. १ येथे साने गुरुजी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्या वेळी रामचंद्र कुबल यांनी रामचंद्र देखणे यांच्या ‘जीवनयोगी साने गुरुजी’ या पुस्तकातील काही निवडक वेच्यांचे अभिवाचन केले.

‘कोमसाप’ची मालवण शाखा ठरली उत्कृष्ट; वामनराव दाते पुरस्कार प्रदान

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेला अलीकडेच पालघर येथे झालेल्या कार्यक्रमात ‘कै. वामनराव दाते उत्कृष्ट कोमसाप शाखा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

मालवणी म्हणजे मने जोडणारी बोलीभाषा : सुरेश ठाकूर

मालवण : ‘मालवणी भाषा ही मने जोडणारी आणि भेदभाव संपवणारी गोड अशी बोलीभाषा आहे. कोकण किनारपट्टीवर अजूनही मराठीच्या चौदा बोलीभाषा आहेत; पण मालवणी भाषेच्या गोडव्याने आणि प्रेमळ आदरातिथ्य संस्काराने या भाषेचा झेंडा आज भाषानगरीत डौलाने फडकत आहे,’ असे मत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या मालवण शाखेचे अध्यक्ष आणि लेखक सुरेश श्यामराव ठाकूर यांनी व्यक्त केले.

‘कोमसाप-मालवण’तर्फे जागतिक पुस्तक दिनी ज्येष्ठांना ग्रंथभेट

आचरा : कोकण मराठी साहित्य परिषदेची मालवण शाखा आणि ज्येष्ठ नागरिक सेवा संघ-आचरे पंचक्रोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आज (२३ एप्रिल) जागतिक पुस्तक दिन आचऱ्यातील यशवंत मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला.

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना ‘उन्हातले चांदणे’ कार्यक्रमाद्वारे कुडाळमध्ये अभिवादन

डाळ : ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या ‘प्राप्तकाल’ या नव्या कादंबरीचे २५ मार्च रोजी प्रकाशन झाले. २८ एप्रिल २०२२ रोजी ते ९२व्या वर्षात पदार्पण करणार आहेत. याचे औचित्य साधून ‘कोकण मराठी साहित्य परिषद-सिंधुदुर्ग’तर्फे २८ मार्च रोजी कुडाळमधील संत राऊळ महाराज महाविद्यालयात ‘उन्हातले चांदणे’ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.