माडावर चढण्यात संजय आंबेकर, प्रियांका नागवेकर प्रथम

रत्नागिरी : हातिस (ता. रत्नागिरी) गावात भारतीय स्वातंत्र्याच्या दिवशी लावलेल्या कल्पवृक्षाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त माडावर चढण्याच्या स्पर्धा झाल्या. शिडीच्या साह्याने नारळ झाडावर चढणारा पुरुष आणि स्त्री गट तसेच झाप विणणे या स्पर्धांचे आयोजन हातिसमध्ये करण्यात आले.

नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेत आदिती नागवेकर प्रथम

रत्नागिरी : हातिस ग्रामविकास मंडळ (हातिस आणि मुंबई) आणि भारत अॅग्रो सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने हातिस येथील कल्पवृक्षाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने आयोजित नारळ खाद्यपदार्थ स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला.

रत्नागिरीत शुक्रवारी निर्यातदारांचे संमेलन, निर्यातविषयक सेवा, उत्पादनांचे प्रदर्शन

रत्नागिरी : अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्ताने केंद्र शासनाच्या वाणिज्य विभागामार्फत निर्यातदारांचे संमेलन आणि रत्नागिरी जिल्हयातील निर्यात होणारी उत्पादने तसेच सेवांविषयीचे प्रदर्शन येत्या शुक्रवारी (२४ सप्टेंबर) रत्नागिरीत होणार आहे.

वंदे मातरम्। वंदे मातरम्।। वंदे मातरम्।।।

वासुदेव बळवंत फडके आणि चापेकर बंधू हुतात्मे झाले. लोकमान्य टिळकांचे त्यांना आशीर्वाद होते. त्यांच्या निधनानंतर क्रांतिकारकांना प्रेरणा मिळाली. त्यांनी दिलेला `वंदे मातरम्`चा जयघोष ७४ वर्षांपूर्वी सुफळ झाला. आज पंचाहत्तरावा भारतीय स्वातंत्र्यदिन साजरा करताना अशा ज्ञात-अज्ञात क्रांतिकारक देशभक्तांना प्रणाम!

स्वातंत्र्यदिनी ७५ कल्पवृक्षाच्या लागवडीसाठी हातीस गाव सज्ज

रत्नागिरी : नारळाचे रोप लावून पहिला स्वातंत्र्यदिन साजरा करणाऱ्या हातीस (ता. रत्नागिरी) गावी येत्या स्वातंत्र्यदिनी कल्पवृक्षाची ७५ रोपे लावली जाणार आहेत. त्यासाठी गाव सज्ज झाले आहे.