साप्ताहिक कोकण मीडिया – २४ एप्रिलचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २४ एप्रिल २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/3e2oydx येथे क्लिक करा.

या अंकात काय वाचाल?
मुखपृष्ठकथा : करोना – चीनच्या मासळी बाजारातून रत्नागिरीपर्यंत…
ब्रिटनमधील रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीचे चार्टर्ड सायंटिस्ट असलेले डॉ. रोहन विजय आंबर्डेकर यांनी कोव्हिड-१९ या महामारीची शास्त्रीय माहिती देण्यासाठी लिहिलेला लेख. रत्नागिरीतील कुरतडे हे डॉ. आंबर्डेकर यांचे मूळ गाव आहे.

संपादकीय : पत्रकारांची सुरक्षा वाऱ्यावरच… (हा लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

स्वातंत्र्य की स्वैराचार?
लॉकडाउनचे उल्लंघन करण्याच्या घटनांबद्दल रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी लिहिलेला लेख…

समाजमाध्यमे व्यापून राहिले करोना वाङ्मय : राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा विशेष लेख..

करोना आणि मयग्याचे हाल! : बाबू घाडीगावकर यांची कथा

ललित लेख –
आईचा श्याम –
सौ. सुनेत्रा जोशी, रत्नागिरी
मोठं शहर सोडायचं धाडस न होणाऱ्या सर्वांसाठी – सौ. शिल्पा करकरे, तुरळ

कोकणचे सुपुत्र असलेले वैभव मांगले लॉकडाउनच्या काळात आपल्या गावी चित्रकलेचा छंद जोपासत आहेत. त्याबद्दलचा वृत्तांत(व्हिडिओ शेवटी दिला आहे.)

त्याशिवाय, विविध विषयांवरचे वाचक विचार, कोकणातील उल्लेखनीय बातम्या, इत्यादी…
संपादक : प्रमोद कोनकर

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply