माझी आई : वालावलच्या कलाकाराचे भावस्पर्शी गाणे

कुडाळ : नुकत्याच पार पडलेल्या मातृ दिनाचे औचित्य साधून वालावल (ता. कुडाळ) येथील दिनेश वालावलकर या कलाकाराने आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने माझी आई हे भावस्पर्शी गाणे यूट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केले आहे.

झी युवा संगीत सम्राटमुळे प्रसिद्ध झालेले नवोदित संगीतकार दिनेश वालावलकर यांना मातृदिनाच्या निमित्ताने काहीतरी वेगळे करावे, असे वाटत होते. त्यातूनच एक कल्पना सुचली आणि ती पूर्ण करण्यासाठी विजय नारायण गवंडे यांचे मार्गदर्शन त्यांना उपयुक्त ठरले. श्री. वालावलकर यांचे दुसरे गुरू श्याम तेंडोलकर यांचेही उत्तम मार्गदर्शन कारणीभूत ठरले. संजय आठल्ये यांनी ती कल्पना अवर्णनीय आणि सुंदर शब्दरचनेतून सिद्ध केली. देवगड येथील डॉ. निशा धुरी यांनी आपल्या सुमधुर आवाजात अतिशय भावपूर्ण पद्धतीने हे गाणे गायिले. त्यांच्या गाण्यातून माझ्या मनातली कल्पना सत्यात उतरली आहे, असे श्री. वालावलकर यांनी सांगितले.

गाणे पूर्ण झाल्यानंतर विद्यानंद वर्दम यांनी स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्या सहकाऱ्यांसह चलचित्रफीत बनविण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर नाईक यांनी ही चित्रफित तयार करण्यासाठी उत्तम दिग्दर्शन केले. मिलिंद आडेलकर यांनी उत्कृष्ट छायाचित्रण आणि संकलनाची जबाबदारी निभावली. डॉ. संजय आकेरकर, सुशील वालावलकर आणि नीलेश गुरव यांनी छायाचित्रणासाठी खूप मोठी मदत केली. या गाण्यात सौ. मानसी वर्दम, सरिता राणे आणि देविका माळगावकर या कलाकारांनी केलेला अभिनय कवितेच्या भावना रसिकांपर्यंत पोचवायला अत्यंत उपयुक्त ठरला.

माझी आई हे गाणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply