रत्नागिरीतील करोना रुग्णसंख्या ८२; आज सापडले नवे पाच रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरीतील करोना रुग्णांची संख्या वाढतच असून, आज (१५ मे) पाच नव्या रुग्णांची भर त्यात पडली आहे. कालही (१४ मे) तीन रुग्ण सापडले होते. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आता ८२ वर पोहोचली आहे. त्यापैकी पाच रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आतापर्यंत जिल्ह्यात तीन जणांचा बळी करोनाने घेतला आहे.

आज (१५ मे) सायंकाळी आधी २९, मग १०९ आणि नंतर सहा रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी २९ आणि १०९ अहवाल निगेटिव्ह होते; मात्र नुकत्याच हाती आलेल्या सहा अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह असून, एक अहवाल निगेटिव्ह आहे. पाच पॉझिटिव्हपैकी चार जण कळंबणी (खेड) उपजिल्हा रुग्णालयातील असून, एक जण रत्नागिरीतील आहे.

दरम्यान, काल (१४ मे) मध्यरात्री आलेल्या आलेले तीन रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह होते. त्या तीनपैकी दोन जण संगमेश्वरातील, तर एक रत्नागिरीतील आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातही काल (१४ मे) नवे तीन करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रुग्णांची संख्या आठवर गेली असून, त्यापैकी दोन रुग्ण उपचारांनंतर बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली. काल आढळलेल्या तिघांपैकी दोन रुग्ण यापूर्वी वाडा (ता. देवगड) येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कातील आहेत. तसेच आणखी एक रुग्ण हा कुडाळ तालुक्यातील आहे.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply