साप्ताहिक कोकण मीडिया – १५ मे रोजीचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे १५ मे २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/1o809c4 येथे क्लिक करा.

१५ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : प्रशासनाच्या हतबलतेचा विपर्यस्त अर्थ (वाचण्यासाठी येथे क्लिकरा.)

मुखपृष्ठकथा : प्रशासनावर खापर, पुढाऱ्यांचे काय? : लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर अनधिकृतपणे आणि अधिकृतपणे येणाऱ्या चाकरमान्यांचा भार जिल्हा प्रशासनाच्या आवाक्याबाहेरचा आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले; मात्र त्यातून प्रशासन हतबल झाल्याचा अर्थ काढून प्रशासनावर खापर फोडणारे पुढारीच या परिस्थितीला जबाबदार आहेत. करोनाच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासन खंबीरच असल्याची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. या साऱ्याचे विश्लेषण करणारा राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचा लेख….

लॉकडाउन ३.० संपून ४.० कडे जाताना… जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांचा लेख..

बोली… हटाटिवळेचो धोंडो… बाबू घाडीगावकर यांची मालवणी बोलीतील गजाल…

लॉकडाउन, पोलीस आणि मी… आगरी बोलीतील कथा…

रसग्रहण… अशोक प्रभू यांनी लिहिलेली बालपणातील एक विनोदी आठवण…

पद्मभूषण धनंजय कीर… धनंजय कीर यांच्या नुकत्याच होऊन गेलेल्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई दूरदर्शनचे निवृत्त सहायक संचालक जयू भाटकर यांनी लिहिलेला लेख… (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

बालकथा – भविष्य सांगणारी पाल… भावना मेनन यांच्या कथेचा अश्विनी कांबळे यांनी केलेला अनुवाद

याशिवाय कोकणातील काही उल्लेखनीय बातम्या आणि विविध विषयांवर वाचकांनी मांडलेले विचार…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply