साप्ताहिक कोकण मीडिया – २९ मे रोजीचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २९ मे २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/1fmf0xj येथे क्लिक करा.

२९ मे २०२०च्या अंकात काय वाचाल?

संपादकीय : समन्वयाच्या अभावाचे चटके अधिक (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुखपृष्ठकथा : ‘आत्मनिर्भर भारत’ ही उद्योजकांसाठी संधीच
करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमधून कोणाला काय काय मिळू शकेल, हे पॅकेज कसे उपयुक्त ठरू शकेल, याचा ऊहापोह मुंबईतील सीए तेजस पाध्ये यांनी या लेखातून केला आहे.

टाळेबंदीत शोधली संधी…
लॉकडाउन काळाचा सदुपयोग करून विविध नागरिकांनी राबवलेल्या उपक्रमांच्या गोष्टी

– देवरुखच्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले विशेष फेस शील्ड (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
– धोका पत्करून हापूसच्या ४०० पेट्यांची विक्री
– ‘ऑन दी स्पॉट पिंट्या’मुळे दिव्यांग भिकारी झाला उद्योजक… (वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
– वाहनांच्या विम्यासंबंधीची फसवणूक टाळणारा अभ्यासक्रम पूर्ण
– चिंध्यांमधून सावरला संसार

ध्येयनिष्ठ देशभक्त : विनायक दामोदर सावरकर
सावरकरांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारा, माधव अंकलगे यांचा लेख…

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply