करोना : रत्नागिरीतील रुग्णसंख्या ३६१, सिंधुदुर्गात १२१ रुग्ण

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या आज (सात जून) दिवसभरात १८ने वाढली असून, ती आता ३६१ झाली आहे. आज सकाळी १२, तर सायंकाळी सहा रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज दिवसभरात आठ जणांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. दरम्यान, सिंधुदुर्गातील रुग्णसंख्या १२१वर पोहोचली आहे.

रत्नागिरीतील स्थिती :
दिवसभरात पॉझिटिव्ह आलेल्या १८ अहवालांचे तालुकानिहाय विवरण असे – संगमेश्वर ९, राजापूर २, कामथे ६, रत्नागिरी १. आतापर्यंत एकूण १६७ जण बरे होऊन घरी गेले आहेत. आतापर्यंत १३ रुग्णांचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये सध्या १८१ जण उपचार घेत आहेत. जिल्ह्यात सध्या ११६ ठिकाणी कन्टेन्मेंट झोन असून, रत्नागिरी तालुक्यात १५ गावांमध्ये, गुहागर तालुक्यात आठ गावांमध्ये, खेड तालुक्यात १६ गावांमध्ये, संगमेश्वर तालुक्यात २३ गावांमध्ये, मंडणगड तालुक्यात दोन गावांमध्ये, दापोलीत १६ गावांमध्ये, लांजा तालुक्यात आठ गावांमध्ये, चिपळूण तालुक्यात १७ गावांमध्ये आणि राजापूर तालुक्यात ११ गावांमध्ये कंटेन्मेंट झोन आहेत.

संस्थात्मक विलगीकरणात असलेल्या ७९ रुग्णांची स्थिती अशी – शासकीय सामान्य रुग्णालय, रत्नागिरी – ४७, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी – ८, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – ८, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी – ५, कोव्हिड केअर सेंटर, घरडा इन्स्टिट्यूट, लवेल, खेड – ५, ग्रामीण रुग्णालय, गुहागर- २, कोव्हिड केअर सेंटर, वेळणेश्वर, ता. गुहागर – १, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली – ३.

इतर जिल्ह्यांतून आलेल्या व्यक्तींना होम क्वारंटाइन केले जाते. आजअखेर होम क्वारंटाइनखाली असणाऱ्यांची संख्या ६२ हजार ७२१ इतकी आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सहा हजार ८९० जणांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी सहा हजार ४६४ तपासणी अहवाल मिळाले आहेत. त्यातील ३६१ अहवाल पॉझिटिव्ह, तर ६ हजार ९४ अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

सिंधुदुर्गातील स्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल (सहा जून) संध्याकाळपासून आजपर्यंत मिळालेल्या नव्या करोना रुग्णांची संख्या पाच असून, एकूण रुग्णसंख्या १२१ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण १२१ करोनाबाधित रुग्णांपैकी १७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत, तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ६१ कन्टेन्मेंट झोन आहेत.

Leave a Reply