सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २६ जून २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवर उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/4f4cw1a येथे क्लिक करा.
२६ जूनच्या अंकात काय वाचाल?
अग्रलेख : मदत वाटपाच्या समन्वयासाठी स्वयंसेवक हवेत (https://kokanmedia.in/2020/06/26/cyclone-2)
मुखपृष्ठकथा : चक्रीवादळातून विचारचक्र – जगभर पसरलेला करोनाचा आजार आणि त्याचा वाढता प्रादुर्भाव असतानाच उद्भवलेल्या निसर्ग चक्रीवादळानंतर ठाण्याच्या श्रीमती गीता कळके यांच्या संवेदनशील मनात सुरू झालेल्या विचारचक्राला दिलेले शब्दरूप
करोना आणि कॉस्ट कटिंग : सध्याच्या परिस्थितीच्या अनुषंगाने मालाड येथील सीए तेजस पाध्ये यांनी लिहिलेला मार्गदर्शनपर लेख….
सोहळो मिरगाचो : सावंतवाडीतील पूर्णिमा गावडे-मोरजकर यांनी लिहिलेला मालवणी बोलीतील लेख…
समजून घेताना : दापोली तालुक्यातील कोळथरे येथील इक्बाल शर्फ मुकादम यांनी त्यांच्या कॉलेजजीवनातील हृद्य आठवणीवर लिहिलेला लेख…
मो-बाइल-वेडी : बाबू घाडीगावकर यांचा ललित लेख
करोना डायरी : किरण आचार्य यांची लेखमाला – नियोजनाविना जाहीर केलेल लॉकडाउन
माणूस घडवू या अभियान : चिंदर (मालवण) येथील महेश गोसावी यांचा मालवणी बोलीतील लेख…
महाराष्ट्राच्या राज्यपालांना काही प्रश्न : रत्नागिरीतील निवृत्त प्राध्यापक माणिक बाबर
……..