रत्नागिरी : रत्नागिरीच्या बालरंगभूमी परिषदेने आयोजित केलेल्या ऑनलाइन बाल-नाट्यकला (एकपात्री सादरीकरण) स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मोठ्या गटात बेळगावच्या सोहम संदीप शहापूरकरचा, तर लहान गटात ठाण्याच्या अस्मि अजित पाटीलचा प्रथम क्रमांक आला आहे. लॉकडाउनच्या काळात घरात असलेल्या मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळावे, या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेला केवळ रत्नागिरीतूनच नव्हे, तर राज्यभरातून आणि अन्य राज्यांतूनही चांगला प्रतिसाद मिळाला. ११८ स्पर्धकांनी यात भाग घेतला, अशी माहिती बालरंगभूमी परिषदेतर्फे देण्यात आली. रत्नागिरी बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आसावरी शेट्ये, उपाध्यक्ष राजकिरण दळी, सल्लागार आणि ज्येष्ठ रंगकर्मी अनिल दांडेकर, कार्यवाह किरण जोशी, कार्यकारिणी सदस्य अस्मिता सरदेसाई आणि खजिनदार पूर्वा खालगावकर यांनी एकपात्री प्रयोगांचे परीक्षण केले.
पहिला गट पाच ते १० वर्षे वयाच्या मुला-मुलींसाठी, तर दुसरा गट ११ ते १५ वर्षे वयाच्या मुला-मुलींसाठी होता. स्पर्धकांनी एकपात्री सादरीकरण करणे अपेक्षित होते. विजेत्यांच्या नावापुढे त्यांच्या व्हिडिओची लिंक दिली आहे. तसेच, सर्वांत शेवटी व्हिडिओही दिले आहेत.
सविस्तर निकाल असा –
मोठा गट
प्रथम – सोहम संदीप शहापूरकर, बेळगाव (https://youtu.be/PXYsbTn7sR4)
द्वितीय – वेदिका विनायक मिसाळ, पुणे (https://youtu.be/ncCOFB-aAWU)
तृतीय – सोहम समीर शिराळकर, कोल्हापूर (https://youtu.be/irCkq_AWSkc)
उत्तेजनार्थ १ – ईश्वरी सिद्धेश कांदोळकर, फोंडा (https://youtu.be/U9SQN7aicqQ)
उत्तेजनार्थ २ – आर्यन सुनील जळगावकर, वरळी-मुंबई (https://youtu.be/Ksng4U5kQA0)
लहान गट
प्रथम – अस्मि अजित पाटील, ठाणे (https://youtu.be/MHjcwB6I8P0)
द्वितीय – गार्गी हृषीकेश पटवर्धन, रत्नागिरी (https://youtu.be/_kGR_Pl9BrA)
तृतीय (विभागून) – नभा भाग्येश कुलकर्णी, पुणे (https://youtu.be/OXwKWLt8s_s)
तृतीय (विभागून) – इरा उदय गोखले, रत्नागिरी (https://youtu.be/FfK1O_vQGAo)
उत्तेजनार्थ १ – भक्ती मुकुल चौधरी, नागपूर (https://youtu.be/q_MI8woiOBQ)
उत्तेजनार्थ २ – काव्यांजली विवेक पाटील, रायगड (https://youtu.be/0mIvJNXsUF4)
विजेत्या स्पर्धकांना सुवर्णपदक, रौप्यपदक आणि कांस्यपदक देण्यात येणार आहे. तसेच प्रमाणपत्रही देण्यात येणार आहे. त्याबद्दलची माहिती बालरंगभूमी परिषदेतर्फे स्पर्धकांना देण्यात येईल, असे परिषदेच्या आसावरी शेट्ये यांनी सांगितले आहे.
……
One comment