सिंधुदुर्गात करोनाचे पाच नवे रुग्ण; एकूण संख्या २५०

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी पाच व्यक्तींचे करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २५० झाली आहे.

आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील नाटळ येथील दोन, ओझरम येथील एक, मालवण तालुक्यातील आचरा येथील एक आणि कट्टा येथील एकाचा समावेश आहे. जिल्ह्यात बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या १९१ झाली असून, सद्यस्थितीत जिल्ह्यात ५३ सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून, एक रुग्ण उपचारांसाठी मुंबई येथे गेला आहे.

परराज्यातून व महाराष्ट्र राज्याच्या अन्य जिल्ह्यांतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन मेपासून आजअखेर एकूण एक लाख २३ हजार ४८८ व्यक्ती दाखल झाल्या आहेत.
……

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.

Leave a Reply