रायगडावरच्या दीडशे वर्षांनंतर भरलेल्या हत्ती तलावाचे संभाजीराजांनी केले पूजन

रायगड : शिवरायांची राजधानी असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरील हत्ती तलाव १५० वर्षांनंतर काठोकाठ भरला आहे. रायगड विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी तलावाला १८ जुलै २०२० रोजी भेट देऊन तलावातील पाण्याचे पूजन केले आणि ओंजळीने तलावाचे पाणी पिऊन तृप्तता अनुभवली.

संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पेजवर हा अनुभव कथन केला आहे.

ते म्हणतात – भरलेला हत्ती तलाव बघण्याची ओढ मनाला अनेक दिवसांपासून लागली होती. तसेही रायगड संवर्धनाची जबाबदारी घेतल्यापासून कामांचा आढावा घेण्यासाठी गडावर नेहमी येतच असतो; पण मनात असूनही करोनामुळे येता येत नव्हते. हत्ती तलाव भरल्याची माहिती मिळाली तेव्हापासून हा भरलेला तलाव पाहण्यासाठी मी फारच उत्सुक होतो. अखेर गडावर येऊन हे नयनरम्य दृश्य पाहिलेच.

भर पावसात रायगड पाहण्याचा आनंद वेगळाच! काठोकाठ भरलेल्या हत्ती तलावातील पाण्याचे पूजन या वेळी करण्यात आले. गडावरची निर्गुंडीची पाने, रानफुले वाहून अगदी साधेपणाने, परंतु मनोभावे जलपूजन केले. रायगड विकास प्राधिकरणाला मिळालेले हे यश अभूतपूर्व आहेच; पण गडावरील वास्तूंच्या इतिहासात प्राधिकरणाचे अमूल्य योगदानसुद्धा आहे. प्राधिकरणाच्या संबंधित सर्व सदस्य, तज्ज्ञ, अधिकारी कर्मचाऱ्यांनी आणि कामगारांनी अहोरात्र केलेल्या कष्टाचे आणि सर्व शिवभक्तांच्या पाठिंब्याचे हे फलित आहे.

हत्ती तलावात भरलेले निळेशार पाणी पाहून ते पिण्याचा मोह मी रोखू शकलो नाही. या तलावातील पाणी कदाचित शिवछत्रपती, संभाजी महाराज, राजाराम महाराजांनीसुद्धा प्यायले असेल, असा विचार मनात क्षणभर तरळून गेला. त्याकाळी असंख्य मावळ्यांची तहान या तलावाच्या भागवली असेल.

तलावाला अजूनही एक-दोन ठिकाणी गळती आहे, त्याचे काम येत्या काही दिवसांत करण्यात येईल. यापूर्वीही या तलावाची गळती काढण्यासाठी पाच ते सहा वेळा प्रशासनाकडून प्रयत्न झाले होते, असे म्हणतात. पण कुणालाही यश मिळाले नव्हते. या वेळी आपण यशस्वी झालो.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या वेबसाइटला नक्की भेट द्या : https://bit.ly/30tD3uz

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s