रत्नागिरी जिल्ह्यात २४ तासांत करोनाचे १०२ रुग्ण वाढले, एकाचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २७) सायंकाळी संपलेल्या २४ तासांत करोनाचे १०२ रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १६५८ झाली आहे. एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची संख्या ५३वर पोहोचली आहे. सिंधुदुर्गातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या ३३४ झाली आहे.

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – जिल्हा कोव्हिड रुग्णालय, रत्नागिरी ३९, उपजिल्हा रुग्णालय, कामथे – २७, दापोली – ११, कळंबणी, खेड – ९, गुहागर – १३, रायपाटण, राजापूर – ३.

दरम्यान, आज ९७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०८४ झाली आहे. आज बरे झालेल्यांमध्ये जिल्हा कोव्हिड रुग्णालयातील दोन, कोव्हिड केअर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी ७, कोव्हिड केअर सेंटर केकेव्ही, दापोली २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, खेड ४५ आणि कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे, चिपळूण येथील ३८, तर कामथे उपजिल्हा रुग्णालयातील तिघांचा समावेश आहे. आता विविध रुग्णालयांमध्ये ३७३ जण उपचार घेत असून, होम आयसोलेशनमध्ये २०, तर उपचारांसाठी इतर जिल्ह्यात गेलेल्यांची संख्या ११ आहे.

आज रत्नागिरीतील एका ७३ वर्षीय करोनाबाधित रुग्णाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. (जिल्हा प्रशासनाच्या माहितीमध्ये नियमानुसार त्या रुग्णाचे नाव देण्यात आलेले नाही. मात्र हा रुग्ण म्हणजे प्रसिद्ध वैद्य प्रमोद ऊर्फ रघुवीर पांडुरंग भिडे आहेत.) त्यामुळे मृतांची संख्या आता ५३ झाली आहे. आतापर्यंतची मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी – १२, खेड – ६, गुहागर – २, दापोली – ११, चिपळूण – ९, संगमेश्वर – ६, लांजा – २, राजापूर – ४, मंडणगड – १.

आज रत्नागिरी शहर आणि तालुक्यात दामले हायस्कूल परिसर, शिवाजीनगर, आंबेकरवाडी-डीएसपी बंगला, कर्ला गणेश स्टॉप, आंबेशेत, कासारवेली, खेडशी-गयाळवाडी, पूर्णगड, निवळी, हॉटेल दर्यासागर, गणपतीपुळे एसटी स्टँड, रत्नागिरी, ओ विंग ग्रामीण पोलीस संकुल, कारवांचीवाडी, चांदेराई, घारपुरेवाडी-कोतवडेवाडी ही क्षेत्रे करोना विषाणूबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत.

मुंबईसह एमएमआर क्षेत्र, तसेच इतर जिल्ह्यांतून आल्याने होम क्वारंटाइन केलेल्यांची संख्या २० हजार ३५४ इतकी आहे. परराज्यातून आणि अन्य जिल्ह्यातून रत्नागिरी जिल्ह्यात कालपर्यंत एकूण दोन लाख १४ हजार १४५ व्यक्ती दाखल झाल्या आहेत, तर रत्नागिरी जिल्ह्यातून इतर राज्यांत तसेच इतर जिल्ह्यांत गेलेल्यांची संख्या एक लाख ४ हजार ४६१ आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply