श्रावण शुद्ध नवमी, शके १९४२
….
राघवयादवीयम् – श्लोक आठवा – अनुलोम
सारसासमधाताक्षिभूम्नाधामसु सीतया । साध्वसाविहरेमेक्षेम्यरमासुरसारहा ।।८।।
अर्थ : समस्त आसुरी सेनेचा विनाशक, सौमत्वाच्या विरुद्ध अत्यंत प्रखर, प्रभावशाली नेत्र असणारा रक्षक श्रीराम आपल्या अयोध्येतील निवासस्थानी सीतेसह आनंदात राहत होता.
।। जय श्रीराम ।।
राघवयादवीयम् – श्लोक आठवा – विलोम
हारसारसुमारम्यक्षेमेरेहविसाध्वसा । यातसीसुमधाम्नाभूक्षिताधामससारसा ।।८।।
अर्थ : आपल्या गळ्यात मोत्यांच्या हाराप्रमाणे, पारिजातपुष्पमाला धारण करून, प्रसन्नता आणि परोपकाराची अधिष्ठात्री अशा निर्भय रुक्मिणीने भरपूर फुले धारण करून कृष्णासह आपल्या घरी प्रस्थान केले.
।। जय श्रीकृष्ण ।।
…….
रामकथा आणि कृष्णकथा एकाच वेळी वाचता येते, हे राघवयादवीयम् या संस्कृत श्लोकसंग्रहाचे वैशिष्ट्य आहे. कवी वेंकटाध्वरी यांनी या श्लोकसंग्रहाची रचना केली. या श्लोकांमधील पहिली ओळ वाचली, तर रामकथा होते (त्याला अनुलोम म्हणतात.) याच श्लोकाची अक्षरे उलट्या क्रमाने वाचली, तर ती कृष्णकथा होते. दररोज एका अनुलोम-विलोम श्लोकाचा मराठी अनुवाद येथे दिला जाणार आहे. हा अनुवाद रत्नागिरीतील निवृत्त संस्कृत शिक्षिका सौ. वंदना दिगंबर घैसास यांनी करून दिला आहे.
(राघवयादवीयम् या अद्भुत रचनेविषयी अधिक वाचण्यासाठी आणि आधीच्या श्लोकांचा अर्थ वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
….
झोंपाळ्यावरची गीता हे पुस्तक घरपोच मागविण्यासाठी कृपया 9422382621 या क्रमांकावर संपर्क साधावा.

