रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. आज (३१ जुलै) घरी सोडलेल्या २४ जणांसह आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण ११९३ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल (३० जुलै) सायंकाळपासून आज रात्री सव्वानऊ वाजेपर्यंतच्या जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या अहवालानुसार ७६ नव्या रुग्णांची भर पडल्याने एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८२६ झाली आहे. सिंधुदुर्गात आज आठ नव्या रुग्णांची वाढ झाली.
रत्नागिरी जिल्ह्यातील परिस्थिती
आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हिड रुग्णालय सहा, समाज कल्याण भवन सहा, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे सहा आणि कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल येथील सहा जणांचा समावेश आहे. आज रत्नागिरीत २५, कामथे येथे ३२, कळंबणीत ९, दापोलीत ५ आणि गुहागरात ९ असे एकूण ७६ नवे रुग्ण सापडले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून, एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची आजची संख्या ५२२ आहे. त्यामध्ये आज रात्री निश्चित झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.
जिल्हा रुग्णालयातील आरटीपीसीआर लॅबमध्ये तपासण्यात आलेले स्वॅब चाचणीचे निगेटिव्ह अहवाल संबंधितांच्या नोंदणीकृत मोबाइलवर एसएमएसद्वारे पाठविले जातात. परंतु तपासणीचा अहवाल हवा असल्यास संबंधितांनी प्रत्यक्ष न येता covidreportapp@gmail.com या ई-मेलवर विनंती अर्ज करावा. जिल्हा रुग्णालयाकडून कोव्हिड-१९ रुग्णांच्या माहितीकरिता हेल्प डेस्क सुरू करण्यात आला असून, तेथील (02352) 226060 या क्रमांकावर दररोज सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत संपर्क साधता येऊ शकेल.
आज रत्नागिरीतील झापडेकर चाळ, हिलटॉप अपार्टमेंट, शिवाजीनगर, कीर्तीनगर, गोडबोले स्टॉप, रत्नागिरी, वैभवनगर अपार्टमेंट, आंबेडकरवाडी, हॉटेल लँडमार्क, थिबापॅलेस रोड, गणेशगुळे, शिंदेवाडी, नाचणे संभाजीनगर, टीआरपी, ही क्षेत्रे करोनाबाधित क्षेत्रे म्हणून घोषित करण्यात आली आहेत
खेडशी, सीईओ बंगला, थिबा पॅलेस रोड, सन्मित्रनगर, निवखोल, मच्छी मार्केट, कुर्धे, नारशिंगे, भाट्ये रोड, गीता भवन, शंखेश्वर गार्डन, राजिवडा, साईनगर-कुवारबाव, गद्रे कंपनी, बीएसएनएल वसाहत, जेल रोड, बसणी, नाचणे-श्रीरामनगर, मिरजोळे, एमआयडीसी, रत्नागिरी या परिसराच्या सीमा पूर्ववत करण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या २२७ ॲक्टिव्ह कन्टेन्मेंट झोन असून त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी २८, दापोली १२, खेड ६५, लांजा ५, चिपळूण १०२, मंडणगड २, गुहागर १० आणि राजापूर ३.
संस्थात्मक विलगीकरणात १२६ जण दाखल असून, त्यांची रुग्णालयनिहाय आकडेवारी अशी – जिल्हा रुग्णालय ६०, उपजिल्हा रुग्णालय, कामथे २४, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे २, उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी १५, कोव्हिड केअर सेंटर, घरडा २, ग्रामीण रुग्णालय, गुहागर १, कोव्हिड केअर सेंटर, केकेव्ही, दापोली २२.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आठ नवे करोनाबाधित आढळले असून, जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३७२ झाली आहे. त्यापैकी २७१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून, सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड