साप्ताहिक कोकण मीडिया – ३१ जुलैचा अंक

सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे ३१ जुलै २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.

अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/2jn8ov8 येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

३१ जुलैच्या अंकात काय वाचाल?

रत्नागिरीतील वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे नुकतेच निधन झाले. साप्ताहिक कोकण मीडियाचा या वेळचा अंक त्यांना श्रद्धांजली वाहणारा आहे. रत्नागिरीसह ठिकठिकाणच्या वैद्यांनी, तसेच अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी वैद्य भिडे यांच्याबद्दलच्या भावना त्यात व्यक्त केल्या आहेत.

वैद्य रघुवीर भिडे : एक स्मरण – रत्नागिरीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुभाष देव यांचा लेख

रसौषधींच्या ज्ञानाचा अर्क : वैद्य रघुवीर भिडे – सावंतवाडीतील ज्येष्ठ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांचा लेख

निष्णात धन्वंतरी, सामान्यातील असामान्य! – राजन विष्णू पटवर्धन यांचा लेख

‘झुंजार’ व्यक्तिमत्त्व लोपले – रत्नागिरीतील वैद्य स्वप्नील नाटेकर यांचा लेख…

आरोग्यविषयक सुरक्षा कवचच गळून पडले – श्रीराम पांडुरंग रायकर यांचा लेख….

काकांविना पोरके झाल्याची भावना – कुवारबाव येथील वैद्या सौ. स्मिता गोरे यांचा लेख…

प्रेरणास्थान हरपल्याची जाणीव – रत्नागिरीतील वैद्या सौ. मंजिरी जोग यांचा लेख

रत्नागिरीचे भिषग्-राज – ज्येष्ठ पत्रकार राजेंद्रप्रसाद मसुरकर यांचे विचार

‘रससिद्ध’ हरपले – प्रसिद्ध वैद्य आणि लेखक परीक्षित शेवडे यांचा लेख

संशोधक वृत्तीचे आयुर्वेद चिकित्सक – रत्नागिरीतील ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. दिलीप पाखरे यांचा लेख

ऋषितुल्य वैद्यरूपी तारा निखळला – डोंबिवलीतील संजय मुंडले यांचा लेख

स्वास्थ्यरक्षक रघुवीर पांडुरंग भिडे – रत्नागिरीतील अॅड. धनंजय भावे यांचा लेख

आयुर्वेदशास्त्रातील ज्ञानसूर्याचा अस्त – रत्नागिरीतील वैद्य योगेश मुकादम यांचा लेख

समाजाचा स्वास्थ्यरक्षक हरपला – राजेश आयरे यांचा लेख

‘अॅः त्याला काय होतंय…’ हे आता ऐकू येणार नाही – प्रमोद कोनकर यांचा लेख

व्रतस्थ योग्याचं चटका लावणारं जाणं – अनिकेत कोनकर यांचा लेख

मुखपृष्ठावरील पोर्ट्रेट : प्रहर महाकाळ

अन्य विषय :
संपादकीय :
नाणारच्या कातळावरची पांढरी रेघ https://kokanmedia.in/2020/07/31/nanareditorial/

लॉकडाउनच्या काळात कोकण उतरले कागदावर – जे. डी. पराडकर यांचा लेख https://kokanmedia.in/2020/07/30/canvas/

सरकारच्या निष्क्रीयतेचा पुरावा रस्त्यावर वाटा शोधत होता… – ‘करोना डायरी’ सदरात किरण आचार्य यांचा लेख…

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply