रत्नागिरी : येथील फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रीय सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीराम पांडुरंग तथा शामराव रायकर (वय ७४) यांचे २९ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले.
‘दर्पण’भूमीचे प्रतिबिंब
रत्नागिरी : येथील फाटक प्रशालेचे निवृत्त उपमुख्याध्यापक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, राष्ट्रीय सेवा समितीचे माजी अध्यक्ष श्रीराम पांडुरंग तथा शामराव रायकर (वय ७४) यांचे २९ सप्टेंबर २०२० रोजी पहाटे कोल्हापूर येथे निधन झाले.
रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेद तज्ज्ञ प्रमोद ऊर्फ रघुवीर भिडे आणि ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ दिलीप मोरे या दोघांच्या अवघ्या अकरा दिवसांत झालेल्या निधनामुळे दोन वेगवेगळ्या शाखांमधील वैद्यकीय शाखांचे आणि त्यावर अवलंबून असलेल्या रुग्णांचे फार मोठे नुकसान झाले आहे. दोघेही करोनाच्या आजाराने निधन पावले, हा एक दुर्दैवी योगायोग. वैद्य भिडे यांचे करोनाविषयीचे आयुर्वेद शास्त्रानुसार संशोधन सुरू होते, तर डॉक्टर मोरे यांनी करोनाबाधित ४४ बालकांना करोनाच्या दाढेतून बाहेर काढून नवजीवन प्राप्त करून दिले होते. या दोघांचाही दुर्दैवी अंत करणाऱ्या आजारामुळे आरोग्य यंत्रणा आणि ती चालविणारी शासन यंत्रणा याविषयीचे अनेक प्रश्न निर्माण होतात.
रत्नागिरीतील वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे नुकतेच निधन झाले. साप्ताहिक कोकण मीडियाचा या वेळचा अंक त्यांना श्रद्धांजली वाहणारा आहे. रत्नागिरीसह ठिकठिकाणच्या वैद्यांनी, तसेच अन्य क्षेत्रांतील व्यक्तींनी वैद्य भिडे यांच्याबद्दलच्या भावना त्यात व्यक्त केल्या आहेत. हा अंक येथून डाउनलोड करता येईल.
वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे आज (२७ जुलै) निधन झाले. सावंतवाडीतील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्य मुरलीधर प्रभुदेसाई यांनी त्यांच्यावर लिहिलेला हा श्रद्धांजलीपर लेख….
रत्नागिरीतील ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ वैद्यचूडामणी रघुवीर भिडे यांचे आज पहाटे एक वाजून ४० मिनिटांनी करोनामुळे निधन झाले.