रत्नागिरी : आज (एक ऑगस्ट) जिल्ह्यातील ५९ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यामुळे करोनामुक्त झालेल्या रुग्णांची जिल्ह्यातील संख्या १२५२ असून, जिल्ह्यात बरे होणाऱ्यांचे प्रमाण ६८.५ टक्के आहे. दरम्यान, आज (एक ऑगस्ट) रात्री नऊ वाजेपर्यंतच्या २४ तासांत १०७ नवे करोनाबाधित आढळले असून एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८८१ झाली आहे.
आज बरे झालेल्यांमध्ये कोव्हिड रुग्णालयातील सात, वेळणेश्वर, गुहागर येथील नऊ, समाजकल्याण भवनमधील १४, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे येथील १८, कोव्हिड केअर सेंटर, घरडा, लवेल येथील ११ रुग्णांचा समावेश आहे.
आजच्या १०७ बाधितांचा तपशील असा – रत्नागिरी ३१, कळंबणी २४, कामथे २८, दापोली ८, गुहागर ९, देवरूख ४, रायपाटण १ रुग्ण.
जेके फाइल्स, रत्नागिरी येथील ६४ वर्षीय पुरुष करोनाबाधित रुग्णाचा आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे करोनामुळे मृत्यू झालेल्यांची जिल्ह्यातील संख्या आता ६० झाली आहे. आतापर्यंतच्या मृतांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी १४, खेड ६, गुहागर २, दापोली १२, चिपळूण १२, संगमेश्वर ७, लांजा २, राजापूर ४, मंडणगड १. आज जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ५१४ आहे.
……
