कॉमर्स शाखेतील शिक्षण आणि करिअरसंधी; तज्ज्ञांची मोफत ऑनलाइन मुलाखतमाला

रत्नागिरी/पुणे : दहावीनंतर शास्त्र शाखा अर्थात सायन्स साइडला गेल्यावर विपुल संधी उपलब्ध असतात, हे सर्वज्ञात आहे; पण कॉमर्सला गेल्यानंतरही खूप मोठ्या प्रमाणावर करिअरसंधी आता उपलब्ध आहेत, हे मात्र सर्वांनाच माहिती असते असे नाही. हीच बाब लक्षात घेऊन प्रोफिशियंट अॅकॅडमीने कॉमर्स शाखेच्या विविध क्षेत्रांत उज्ज्वल करिअर घडवलेल्या अनुभवी तज्ज्ञांची ऑनलाइन मुलाखतमाला आयोजित केली आहे. पाच ऑगस्टपासून ही मुलाखतमाला सुरू होत असून, ती घरबसल्या, मोफत पाहता येणार आहे. यासाठी नोंदणीची लिंक शेवटी दिली आहे.

‘दहावीचे निकाल लागले, की सगळ्या मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात एकच प्रश्न रुंजी घालत असतो. पुढे काय? खूप मार्क्स मिळविलेले विद्यार्थी शास्त्र शाखेला प्रवेश घेतात; पण स्वतःचा (किंवा स्वतःच्या पाल्याचा) कल लक्षात घेऊन प्रवेश घेण्याचे प्रमाण कमी असते. शास्त्र शाखेकडे ज्यांचा कल आहे, त्यांनी जरूर तिथे जावे; मात्र कॉमर्समध्ये किंवा अन्य कोणत्या शाखेत करिअरसंधी मिळतील की नाही या साशंकतेमुळे तसा निर्णय घेतला जाऊ नये. मुलांची आणि पालकांची या बाबतीत द्विधा मनःस्थिती झालेली असते. म्हणूनच प्रोफिशियंट अॅकॅडमीने कॉमर्स शाखेतील विविध पारंपरिक आणि नव्या क्षेत्रांतील अनुभवी तज्ज्ञांच्या मुलाखती आयोजित केल्या आहेत. या मुलाखती पाहिल्यावर मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनात कॉमर्समधील शिक्षण आणि करिअरबद्दल असलेल्या शंका दूर होण्यास मदत होईल आणि आपला कल ओळखून त्यांना कॉमर्सला प्रवेश घ्यायचा असेल, तर तो निर्णय पक्का करणे सोपे होऊ शकेल,’ अशी भूमिका प्रोफिशियंट अॅकॅडमीचे संस्थापक प्रा. शौनक माईणकर यांनी मांडली. प्रोफिशियंट अॅकॅडमी (https://www.proficientacademy.com) ही कॉमर्समधील ११वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देणारी संस्था असून, रत्नागिरी आणि पुणे येथे संस्थेची कार्यालये आहेत.

अकाउंटन्सी, बँकिंग, फायनान्स, टॅक्सेशन, ऑडिट, शेअर बाजार, फॉरेन्सिक अकाउंटिंग, संशोधन अशी विविध क्षेत्रे कॉमर्सशी निगडित असून, त्यात उच्च शिक्षण आणि करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होत आहेत. या क्षेत्रांतील तज्ज्ञांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत. प्रोफिशियंट अॅकॅडमीच्या, तसेच कोकण मीडियाच्या यू-ट्यूब चॅनेलवर, तसेच या दोन्ही संस्थांच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजवर या मुलाखती पाच ऑगस्टपासून दररोज सकाळी ११ वाजता पाहता येतील. त्यांचा तपशील असा –

पाच ऑगस्ट
विषय :
डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेशन
तज्ज्ञ : सीए वैभव देवधर, रत्नागिरी (जीएसटी तज्ज्ञ)

सहा ऑगस्ट
विषय :
फॉरेन्सिक अकाउंटिंग (आर्थिक घोटाळ्यांचा तपास लावणारी शाखा)
तज्ज्ञ : डॉ. अपूर्वा जोशी, पुणे (देशातील पहिल्या महिला सर्टिफाइड फॉरेन्सिक अकाउंटंट, सर्वांत तरुण सर्टिफाइड फ्रॉड एक्झामिनर)

सात ऑगस्ट
विषय :
बँकिंग
तज्ज्ञ : विक्रम पुरोहित (बँक ऑफ इंडिया बेंगळुरू शाखेचे मुख्य व्यवस्थापक, अँटी मनीलाँडरिंग तज्ज्ञ)

आठ ऑगस्ट
विषय : कॉमर्स शाखेतील संशोधन
तज्ज्ञ : डॉ. शिल्पा कुलकर्णी, पुणे (नॉलेज वीव्हर्स प्रा. लि. या कंपनीच्या संचालिका)

नऊ ऑगस्ट
विषय : शेअर बाजार, अर्थविषयक पत्रकारिता, इत्यादी
तज्ज्ञ : नंदकुमार काकिर्डे, पुणे (कॉसमॉस बँकेचे संचालक, पुणे शेअर बाजाराचे माजी संचालक)

कॉमर्सच्या अनेक क्षेत्रांमध्ये उत्तम करिअर घडवलेल्या या व्यक्तींच्या मुलाखतींच्या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना करिअर संधींबद्दल अनुभवाचे बोल ऐकता येतील आणि आयुष्याची दिशा निश्चित करायला मदत होईल, असा विश्वास प्रा. शौनक माईणकर यांनी व्यक्त केला असून, १०वी झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

मोफत नोंदणी करण्याकरिता लिंक : https://bit.ly/3fvj5on

पहिल्या मुलाखतीची लिंक : https://youtu.be/myVUH6vduLs
कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक्स
प्रोफिशियंट अॅकॅडमी – यू-ट्यूब चॅनेल फेसबुक पेज इन्स्टाग्राम पेज
कोकण मीडिया – यू-ट्यूब चॅनेल फेसबुक पेज इन्स्टाग्राम पेज

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

One comment

Leave a Reply