“बाप्पा मोरया” ऑनलाइन शॉर्टफिल्म फेस्टिव्हल २०२०

कुडाळ : आपल्या लाडक्या गणेशाचे आगमन आता दोनच दिवसांत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर वर्षीचा करोना काळातील गणेशोत्सव डोळ्यांसमोर ठेवून “आम्ही रंगकर्मी” आयोजित आणि “विद्यम आर्टस्” प्रस्तुत कोकणातील पहिलावहिला ऑनलाइन शॉर्ट फिल्म फेस्टिव्हल २०२० भरवला जात आहे. तो संपूर्णपणे गणेशोत्सव या संकल्पनेवर आधारलेला असेल. त्यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपली संस्कृती, गणेशोत्सवामागील संकल्पना आणि या उत्सवातील वेगवेगळे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलचा मूळ उद्देश आहे. महोत्सवात सहभागी होण्यासाठी काही विषय देण्यात आले आहेत. त्या विषयांवर लघुपट बनवणे अपेक्षित आहे. स्पर्धेचे विषय असे – १) निरोप, २) विघ्नहर्ता तू, ३) आठवणीतला बाप्पा, ४) चाकरमान्यांचा बाप्पा, ५) करोनाचक्रातील गणेश चतुर्थी.
फेस्टिव्हलसाठी नाट्यदिग्दर्शक केदार देसाई, मराठी वृत्त निवेदक ऋषी देसाई, नाट्यदिग्दर्शक साईनाथ नेरूरकर मार्गदर्शन करणार आहेत. स्पर्धेतील लघुपटांचे परीक्षण दूरदर्शन मालिका आणि सिनेक्षेत्रातील दिग्गज मंडळी करणार आहेत.

या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवेशाची अंतिम तारीख ५ सप्टेंबर २०२० असून प्रथम येणाऱ्या तीन उत्तम लघुपटांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपयांची बक्षिसे आणि प्रमाणपत्र मिळणार आहे.

बाप्पा मोरया ऑनलाइन शॉर्टफिल्म फेस्टिव्हलसंदर्भात अधिक माहितीसाठी ९४२०९७९२८१ किंवा ९४२२९९९८८० या मोबाइलवर संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply