सध्या ‘करोना’च्या संकटामुळे लॉकडाउन असल्याने अन्य नियतकालिकांप्रमाणेच साप्ताहिक कोकण मीडियाच्या अंकाची छपाई करणे शक्य होऊ शकलेले नाही. त्यामुळे २१ ऑगस्ट २०२० रोजीचा अंक ऑनलाइन मोफत उपलब्ध करत आहोत. खाली क्लिक केल्यास अंकाची पीडीएफ फाइल डाउनलोड करता येईल.
अंकाची पीडीएफ आमच्या इन्स्टामोजोच्या ऑनलाइन स्टोअरवरही मोफत उपलब्ध आहे. डाउनलोड करण्यासाठी कृपया https://imojo.in/3w3oy45 येथे क्लिक करा. हा अंक ई-बुक स्वरूपात गुगल प्ले बुक्सवरही उपलब्ध आहे. तेथून डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. आमच्या ई-मॅगझिन्स विभागात मागील अंकही उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
२१ ऑगस्टच्या अंकात काय वाचाल?
संपादकीय : नियम पाळू, पण उत्सव साजरा करूच! https://kokanmedia.in/2020/08/21/editorialskm21aug/
मुखपृष्ठकथा : लाभो सर्वां निरोगिता – करोना आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर, गतस्मृती जागवताना यंदाचा कोकणातला गणेशोत्सव कसा असेल आणि कसा असावा, याबद्दल धीरज वाटेकर यांनी लिहिलेला चिंतनपर लेख…
अग्रपूजेचा मान असलेले दैवत : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांचा लेख….
वार्षिक पाहुण्याच्या पाहुणचाराचे दिवस : चिंदर (मालवण) येथील विवेक (राजू) परब यांचा लेख…
गणनायका… : बोरिवलीतील रामकृष्ण विनायक अभ्यंकर यांचा लेख…
आगळ्यावेगळ्या प्रथा आणि परंपरा : कोकणातील गणेशोत्सवातील विविध प्रथा-परंपरांचा आढावा घेणारा लेख…
चिठ्ठी काढून ठरतो मूर्तिदाता : ए. के. मराठे यांचा लेख
नसीमाचो गणपती : चिंदर (मालवण) येथील महेश गोसावी यांची मालवणी बोलीतील कथा…
देवरुखचा जर्मन गणेश आणि मानाचा चौसोपी गणपती : प्रमोद हर्डीकर यांनी दिलेली माहिती
विघ्न हराया यावे आता… : बाबू घाडीगांवकर यांनी गणपतीबाप्पाला लिहिलेले पत्र
गणपती विसर्जन घरीच – काळाची गरज : रत्नागिरीतील श्रद्धा कळंबटे यांचा लेख…
स्वातंत्र्यदिन आणि मी : दापोलीतील इक्बाल शर्फ मुकादम यांचे विचार…
सरकारने सर्वसामान्यांना मदत केली की पिळवणूक? : ‘करोना डायरी’त किरण आचार्य यांचा लेख…