रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी करोनामुळे सहा जणांचा मृत्यू; १४५ नवे रुग्ण

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (ता. २०) एकाच दिवशी सहा करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली.

आज रत्नागिरीत ३२ आणि ५५ वर्षे वयाचे दोन पुरुष, चिपळूणमध्ये ३८ आणि ६५ वर्षे वयाचे दोन पुरुष रुग्ण, दापोलीतील ७० वर्षीय महिला आणि संगमेश्वर येथील ६२ वर्षे वयाच्या पुरुष करोनाबाधिताचा मृत्यू झाला. त्यामुळे एकूण मृतांची संख्या ११८ झाली आहे. सर्वाधिक ४० मृत रत्नागिरी तालुक्यातील आहेत. खेडमध्ये १२, गुहागर तालुक्यात ४, दापोलीत २१, चिपळूणमध्ये २२ संगमेश्वरात ९, लांजा तालुक्यात २, राजापूरमध्ये ७ तर मंडणगड तालुक्यातील एका रुग्णाचा आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झाला आहे.

आज जिल्ह्यात १४५ नवे करोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२७५ झाली आहे. आजच्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ८, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ७४, लांजा २, राजापूर १, कामथे ५५, संगमेश्वर (देवरूख) ५.

बरे झालेल्या २४ रुग्णांना आज घरी पाठविण्यात आले. त्यात जिल्हा रुग्णालयातील ११, कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी येथील ९, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे येथील २, तर होम आयसोलेशनमध्ये असलेल्या दोघांचा समावेश आहे. आजपर्यंत २०१३ रुग्ण बरे झाले आहेत. एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३२७५ आहे. आजपर्यंत ९८ जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. बाहेरगावाहून आल्याने २६ हजार ९९४ जण होम क्वारंटाइनमध्ये आहेत.

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply