शायर बदीउज्जमा खावर पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा

दापोली : शायर पंडित बदिउज्जमा खावर यांच्या तिसाव्या स्मृतिदिनानिमित्ताने दापोलीतील युवा फाउंडेशन, दापोली साहित्य कट्टा आणि मित्रांच्या कविता यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्याकरिता २० सप्टेंबरपर्यंत कविता पाठविता येतील.

ख्यातनाम शायर, कवी, गझलकार बदीउज्जमा खावर यांचा तिसावा स्मृतिदिन येत्या २७ सप्टेंबर रोजी आहे. दापोलीतील नॅशनल हायस्कूलमध्ये ते शिक्षक होते. उर्दू आणि मराठीत त्यांनी लेखन केले. त्यांनी २० पुस्तके लिहिली. त्यांचा परिचय नव्या पिढीला व्हावा, यासाठी राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेकरिता येत्या २० सप्टेंबरपर्यंतच कविता पाठविता येतील. स्पर्धेचा निकाल खावर यांच्या स्मृतिदिनी २७ सप्टेंबर रोजी जाहीर होईल.

विजेत्या स्पर्धकांना १००० रुपये, ७५० रुपये आणि ५०० रुपये अशी अनुक्रमे तीन पारितोषिके आणि डिजिटल प्रमाणपत्र, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना डिजिटल सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. अधिक माहितीसाठी पांडुरंग जाधव (९८९२८१२२१८) यांच्याशी संपर्क साधावा.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply