रत्नागिरीत १५२ आणि सिंधुदुर्गात १९० करोनाबाधितांची वाढ

रत्नागिरी : आज (१६ सप्टेंबर) १५२ नवे करोनाबाधित रुग्ण रत्नागिरी जिल्ह्यात आढळले. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९० नव्या करोनाबाधितांची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज सापडलेल्या रुग्णांचा तालुकानिहाय आणि चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – दापोली ३, खेड ५, गुहागर ७, चिपळूण १, संगमेश्वर १५, रत्नागिरी २८, लांजा ८, राजापूर १९ (एकूण ८६). रॅपिड अँटिजेन टेस्ट – खेड ६, गुहागर ७, चिपळूण ३६, संगमेश्वर २, रत्नागिरी १२, लांजा ३ (एकूण ६६). जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६२९७ झाली आहे.

तालुकानिहाय मृतांची संख्या अशी – मंडणगड २, खेड २८ दापोली २३, चिपळूण ४४, गुहागर ५, संगमेश्वर १६, रत्नागिरी ५५, लांजा ६, राजापूर ८. एकूण १८७. मृतांचे प्रमाण २.९६ टक्के आहे. सध्या गृह विलगीकरणामध्ये ४५८ जण आहेत.

सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ सप्टेंबर) आणखी १९० व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता २७२० झाली आहे. आतापर्यंत १५३१ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ११२९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप ५६९ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ५० जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८४८१ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ५९० व्यक्ती आहेत.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

औषधाविषयी अधिक माहिती व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी https://wa.me/919423292437 या लिंकवर क्लिक करा.
Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply