रत्नागिरीच्या इन्फिगो रुग्णालयात मोफत मोतिबिंदू तपासणी सप्ताह सुरू

रत्नागिरी : रत्नागिरीत नव्याने सुरू झालेल्या इन्फिगो आय केअरमध्ये आजपासून (दि. ८ ऑक्टोबर) मोतिबिंदू तपासणी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहात मोतिबिंदूची तपासणी मोफत केली जाणार आहे. इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. श्रीधर ठाकूर यांनी ही माहिती दिली. मोतिबिंदू तपासणी सप्ताहात मुंबईतील तज्ज्ञ डॉक्टर तपासणी करणार आहेत.

मुंबईतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटल हे डोळ्यांचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल गेल्या महिन्यात रत्नागिरीतही सुरू झाले आहे. तेथे डोळ्यांच्या आजारांसंबंधी विविध उपचार केले जात आहेत. लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारासंदर्भात मोफत मोफत तपासणी सध्या सुरू आहे. तसेच, आजपासून मोतिबिंदू निदान सप्ताहही सुरू झाला आहे. डॉ. प्रदीप देशपांडे, डॉ. नितीन तिवारी, डॉ. प्रसाद कामत, डॉ. सपना गंधे आणि डॉ. प्रशांत कोरमा हे नामवंत तज्ज्ञ रुग्णांची तपासणी आणि निदान करतील, तसेच आवश्यक असल्यास शस्त्रक्रियाही करतील.

लहान मुलांचे आळशी डोळे म्हणजे लेझी आय, गुंतागुंतीच्या किंवा अन्य शहरांमध्ये जाऊन येऊनही योग्य उपचार होऊ न शकलेल्या रुग्णांची तपासणी आणि त्यावरील उपचार येथे करण्यात आले आहेत. आतापर्यंत सुमारे दीड हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील निम्म्या रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गावागावांमध्ये झालेल्या दहा शिबिरांमध्ये सहाशेहून अधिक रुग्णांनी तपासणी केली आहे. गेल्या महिनाभरात जिल्ह्यात काचबिंदूचे म्हणजेच ग्लुकोमाचे सुमारे तीन टक्के रुग्ण आढळले. त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

लहान मुलांच्या लेझी आयचे प्रमाण रत्नागिरी जिल्ह्यात तुलनेने अधिक असल्याचे बाल नेत्ररोगतज्ज्ञ डॉक्टर प्रदीप देशपांडे यांनी सांगितले. लहान वयातच विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी रुग्णालयातर्फे केले आहे. परजिल्ह्यात मोतिबिंदूची अयशस्वी शस्त्रक्रिया झालेली संगमेश्वर येथील एक महिला रुग्ण इन्फिगोमध्ये आली होती. तिच्यावर पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली. त्यामुळे तिला पुन्हा एकदा दृष्टी प्राप्त झाली, असाही एक अनुभव इन्फिगो रुग्णालयातर्फे सांगण्यात आला.

ठिकाण : इन्फिगो आय केअर हॉस्पिटल,
शॉप नं. ३/४/५, शांतादुर्ग संकुल,
साळवी स्टॉप, मेन रोड, रत्नागिरी

संपर्क क्रमांक : 9372766504

(लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजाराविषयी आणि ते होऊ नयेत म्हणून कशी खबरदारी घ्यावी, याविषयी इन्फिगो हॉस्पिटलमधील बालनेत्ररोगतज्ज्ञ दीपक देशपांडे यांनी दिलेली माहिती पाहा सोबतच्या व्हिडिओमध्ये…)

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply